Today Horoscope 15 October 2024 : आज वृद्धी योग व कौलव करण राहील. आज द्वादशी तिथी असून, चंद्र कुंभ व मीन राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा मंगळवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
मेषः
आज आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. नियोजित कामात चांगली प्रगती कराल. जुन्या मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. मनासारखी कामे होतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल.
वृषभः
आज कामात यशस्वी व्हाल. कोणत्याही गोष्टीसाठी पराक्रमाची शर्थ कराल. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसा हक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या भेटी घडतील.
मिथुन:
आज भावनावर नियंत्रण ठेवा. इतरांच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागले. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी पथ्यपाणी सांभाळा. घराकडे जातीने लक्ष द्याल. स्वभावात राग उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. अंहकारवृत्ती मुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा.. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही.
कर्क:
आज धनलाभाचा योग आहे. निद्रानाशाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण मानसिक अस्थिरता असू शकते. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका.
सिंहः
आज भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. आपणास उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. मत्सर संवाद टाळावा. कोणाचाही द्वेष करू नका. व्यापार उद्योगात वाढ होईल.
कन्याः
आज व्यापार रोजगारात अनुकूल असा प्रतिसाद मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील. खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल. व्यापारात भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. हितशत्रु आणि विरोधकांवर मात कराल. रखडलेल्या कामास गती मिळेल. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहिल.
तुलाः
आज कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. भावंडांशी मतभेद संभवतात. शेजाऱ्यांच्या गुप्त कारवायांमुळे त्रासून जाल. घरातील तंग वातावरण काही वेळा त्रासदायक होईल. व्यापारात फायदा नुकसानीच्या घटना घडतील. नोकरीत अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल. व्यापारानिमित्त प्रवास होईल.
वृश्चिकः
आज व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. तुमची अध्यात्मिक साधना फळाला येईल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्व कराल. फाजिल आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा.
धनुः
आज व्यापार रोजगातात काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. योग्य वेळी पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे थोडी चिडचिड होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. स्वप्नांचा संबंध वास्तवाशी लावण्याचा प्रयत्न करू नये. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा.
मकरः
आज हुशारी आणि उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. प्रतिकुल परिणाम येण्याची शक्यता आहे. व्यापार उद्योग क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारा सोबत वाद विवाद टाळा. व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. फार ताण घेऊ नका. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे.
कुंभः
आज तब्येत खूष राहील. मनाप्रमाणे वागवून घ्याल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल.