Today Horoscope 15 July 2024 : आज सिद्ध योग व बालव करण आहे. चंद्राचा शुक्राशी देखील योग होत आहे. कसा असेल सोमवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
मेषः
आज प्रवासाच्या संधी मिळतील. काळजी घ्यावी लागेल. घरात सर्वांचीच चिडचिड होईल. मानसिक परेशानी क्लेश उत्पन्न होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. आरोग्य बाबतीत विशेष काळजी घ्यावी. चिंताग्रस्न मन राहील. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे. आर्थिक हानी होण्याची संभवना आहे. आरोग्य बाबतीत विशेष काळजी घ्यावी.
वृषभ:
आज कलावंतांना संधी मिळतील. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. संततीसंबंधी तुमचे विचार वेगळे असतील परंतु तुमच्या मताशी मुलं सहमत होतीलच असे नाही. घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र तोडगे काढावे लागतील. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. मन प्रसन्न राहील. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील.
मिथुन:
आज यशस्वी व्हाल. योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. यशाचा आलेख उंचावेल. मनोबल उंचावलेले असेल. मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. मानसन्मानात वाढ होईल. प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
कर्कः
आज विचारपूर्वक निर्णय घ्या. घरातील मोठ्या व्यक्तींशी न पटल्यामुळे ताणतणाव जाणवेल. यश मिळू शकेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष द्यावे. शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल.
सिंहः
आज कामाचा दर्जा वाढवण्यावर तुमचा भर राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. मानसिक अवस्था उत्तम राहणार आहे. मात्र अतिउत्साह व अतिरेकपणा टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. प्रयत्न यशस्वी होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. आज भरभराटीचा दिवस आहे. कामे पूर्णत्वास जातील.
कन्या:
आज फसवणूक होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. भाग्याची साथ तर चांगली मिळेल. कार्यक्षेत्रात भरभराटी होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल.
तूळ:
आज आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडा काळ थांबावे लागेल. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. नोकरी निमित्त घराबाहेर राहण्याचे योग येतील. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोष जनक वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे.
वृश्चिकः
आज कलाकारांच्या कलेला दाद मिळेल. प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. दुरवरचे प्रवास घडतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल.
धनुः
आज आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. तुमच्या बुद्धीमत्तेवर वरिष्ठ खूष होतील. रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. सामाजिक मान सन्मान वाढेल. कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन घडणार आहे. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे.
मकरः
आज अडलेली कामे मार्गी लागतील. ताणतणाव वाढल्याचे जाणवेल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. प्रसिद्धीचे योग येतील. महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. भाग्योदयकारक दिवस आहे. नशीबाची साथ लाभणार आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल.
कुंभः
आज अंथरूण पाहून पाय पसरलेले चांगले पडेल. मनावरचा ताण वाढेल. बौद्धीक आणि वैचारिक पात्रता वाढेल. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात.
मीनः
आज यशस्वी व्हाल. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. पैशाची कामे होतील. शासकीय नोकरदारासाठी यशस्वी दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. व्यापारात लाभ होईल. आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल.