मेषः
आज तडजोड करावी लागेल. भावंडांशी मतभेद संभवतात. शेजाऱ्यांच्या गुप्त कारवायांमुळे त्रासून जाल. तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. व्यापारात फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचन मनानाची गोडी वाढेल. कुटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. कुटुंबात मतभेद संभवतात.
वृषभः
आज पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. बौद्धीक क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. स्वभावात थोडा निष्काळजीपणा राहील. स्वभावात चंचलता निर्माण होईल. वाद विवाद टाळा. व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. फार ताण घेऊ नका. भागीदाराची मदत घ्यावी लागेल.
मिथुन:
आज प्रेमीजनांना प्रेमप्रकरणात अडथळे संभवतात. कोणत्याही निर्णयात ठामपणा नसल्यामुळे कामाची गती मंदावेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारी वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लागेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल.
कर्क
आज प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. प्रसिद्धी मिळवाल. सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल.
सिंहः
आज हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. कोणत्याही गोष्टीसाठी पराक्रमाची शर्थ कराल. अडचणी येतील. परंतु एकंदरीत यशाकडेच वाटचाल राहणार आहे. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. जुनी येणी वसूल होतील. नावलौकिक वाढेल. अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल.
कन्याः
आज उत्साही वातावरण लाभेल. आनंद अधिकच दुणावेल. नवीन संधीचे दान तुमच्या पदरात टाकण्यासाठी येत आहे. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात. आपणास उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. आनंदी राहाल.
तूळ:
आज मोठ्या भावंडांची मदत मिळेल. तुमच्या कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील. लाभदायक दिवस आहे. उत्तम प्रतिसाद मिळेल. बौद्धीक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. रखडलेल्या कामास गती मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी कळेल.
वृश्चिकः
आज रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक लाभ मात्र मिळणार नाही. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. कामाच्या दृष्टीकोनातून कष्टदायक असणार आहे. वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. व्यापार रोजगातात काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. अर्थप्राप्तीत अडथळे निर्माण होतील.
धनुः
आज वैवाहीक सुखात वाढ होईल. चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मूड राहील. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. व्यवहारात स्त्रियांच्या मध्यस्थीमुळे मनासारखी कामे होतील. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल.
मकरः
आज तब्येत खूष राहील. मनाप्रमाणे वागवून घ्याल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. मोठी पदप्राप्ती मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. प्रोफेसर यांच्यासाठी शुभदिवस आहे.
कुंभः
आज मोहात न अडकता कामे करण्याला प्राधान्य द्या. पथ्यपाणी सांभाळा. घराकडे जातीने लक्ष द्याल. स्वभावात राग उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकारवृत्तीमुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा.
मीनः
आज स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रेंगाळण्याची शक्यता आहे. वाचनाची आवड जोपासाल आणि ज्ञानाचा आनंद घ्याल. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल.