Today Horoscope 13 September 2024 : आज सौभाग्य योग तैतील करण राहील. आज भाद्रपद दशमी तिथि आहे, चंद्र धनु राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा शुक्रवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
मेषः
आज घरात एखादी चांगली खरेदी कराल. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. नोकरी व्यवसायात अचानक फायदा होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. धार्मिकतेकडे जास्त कल राहील. आत्म विश्वासात वाढ झाल्याने कोणतेही काम सहजतेने करु शकाल. मौजमजा करण्याकडे कल राहील. वाद विवाद टाळावेत. प्रवासातून आर्थिक लाभ होतील.
वृषभ:
आज विचारांमध्ये कायम एक गोंधळ राहील. धाडस गोळा करावे लागेल. थोडी मानसिक अस्थिरता जाणवेल. व्यापारात नोकरीत रागावर नियंत्रण ठेवा. संयम बाळगुन काम करा. अन्यथा हानी संभवते. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद निर्माण होतील. नवीन खरेदीत पैसे खर्च होतील. व्यापारात प्रसिद्धी आणि यश मिळयाची शक्यता आहे. भांडण आणी वादविवाद टाळावेत.
मिथुनः
आज पैसा खर्च कराल. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. कर्तव्य निभावाल. कार्यक्षेत्रात वेळेचा चांगला सदुपयोग कराल. कामकाजामध्ये वाद होईल. विचारा अंतीच काळजी पूर्वक निर्णय घ्या. महत्वकांक्षा पूर्ण होतील. यश मिळवल्याने उत्साह वाढेल. प्रगतीकारक दिनमान आहे. आर्थिक लाभ होतील. व्यापारात व्यवसाय फायदेशीर राहील.
कर्कः
आज आर्थिक आवक वाढेल. अडलेली कामे पूर्ण होतील. फायदा होईल. संधी चालून येतील. व्यापारात नवीन कार्याची योजना आखाल. नोकरीतील नवीन योजना भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. व्यापार चांगला चालेल. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. योजनेनुसार काम केल्यास फायदा होईल. आईवडिलांशी असलेले संबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढणार आहे.
सिंहः
आज वडिलोपार्जित धंद्यामध्ये वाढ कराल. किर्ती प्रसिद्धीचे योग येतील. नवीन नोकरी लागू शकते. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. व्यवसायात बरीच उलाढाल कराल. विद्यार्थ्यांना एखाद्या स्पर्धेत चांगले यश मिळू शकते. कर्मचाऱ्यांना लाभ होतील. निर्णय महत्वपूर्ण राहतील.
कन्याः
आज नोकरीमध्ये कोणावरही अवलंबून राहू नये. स्वत:ची कामे स्वतः करावीत. प्रेमप्रकरणात घरच्या विरोधाला तोंड द्यावे लागेल. रोजगारात विपरित प्रसंग घडतील. आर्थिक टंचाई निर्माण होतील. मनात नैराश्य निर्माण होईल. विचार पूर्वक निर्णय घ्या. खर्चामुळे चिंतीत राहाल. खर्चामध्ये वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ:
आज भक्तिमार्गाकडे वळाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. नोकरी व्यवसायात तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. कामात यश येईल. नोकरी रोजगारात प्रसन्न वातावरण असल्यामुळे आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. विचारपूर्वक कामे केली तर आजचा दिवस चांगला जाईल. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहील.
वृश्चिकः
आज लोकांची मने दुखावली जातील. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नये. नोकरीत बदल करण्याच्या संधी मिळतील वा मुलाखती लांबणीवर पडतील. कौटुंबिक पातळीवर कुटुंबातील सदस्यांच्या भावनेकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारात आर्थिक नियोजानावर सावधानीपूर्वक निर्णय घ्या. मुलाची चिंता सतावेल. दूरवरचे प्रवास टाळावेत. व्यवहार सावधानी पूर्वक करावेत.
धनुः
आज आर्थिक आवक चांगली राहील. बऱ्यापैकी पैसा मिळेल. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. जास्तीचे यश मिळू शकेल. उत्तम दिवस आहे. वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित कराल. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील.
मकर:
आज नवीन योजना राबवाल. मानसिक प्रगती होईल. शांत आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. नावलौकिक मिळेल. रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकाऱ्यांकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. व्यापारात काहीबाबतीत अडचणी निर्माण होतील. आज व्यवहारात सावधपणा बाळगा. प्रवासातून आज लाभ होणार आहे. मनावर नियंत्रण ठेवा.
कुंभ:
आज संधी मिळतील. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे रहातील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. प्रगती चांगली होईल. कार्यक्षेत्रात यश मिळेल. महत्वाची कामे हाती असतील तर पूर्ण होतील. कामात उत्साह वाढणार आहे. जबाबदारीत वाढ होईल. व्यापारात आर्थिक फायदा होईल. दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नका. निर्णय फायदेशीर ठरतील.
मीन:
आज तब्येत चांगली ठेवा. पायाची दुखणी होऊ शकतात. संततीच्या वागण्या बोलण्याचा त्रास होऊ शकतो. इस्टेटीचे प्रश्न मार्गी लागले तरी त्यात थोडी तडजोडही करावी लागेल. नोकरीत कामाच्या ठिकाणी ताण जाणवेल. प्रयत्न यशस्वी होण्यास अडथळे निर्माण होतील. सन्मान व किर्ती डागळण्याची शक्यता आहे. खर्च विचारपूर्वक करावा.