Today Horoscope 13 August 2024 : ब्रह्मा योग व बालव करण असून, आज श्रावण मंगळवार आहे, योग-संयोगात कसा जाईल आजचा श्रावण दुर्गाष्टमीचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
मेष:
आज मोठी आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य दिनमान आहे. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल, ठरवलेले उद्दीष्ट पूर्ण कराल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात नाविन्य पूर्ण प्रयोग कराल. केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. कामानिमित्त प्रवास घडतील. आर्थिक लाभ होईल.
वृषभ:
आज विद्यार्थी अभ्यासापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जास्त रमतील. नोकरीत वरिष्ठांच्या विरुद्ध बंड पुकाराल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्यांना विशेष संधी मिळतील. उत्तम सुख मिळेल. आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील.
मिथुन:
आज घरासंबंधी समस्या होऊ शकते. मौल्यवान वस्तु गहाळ होण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. अनिद्रेचा त्रास होईल. व्यापारीवर्गाकरिता आजचा दिवस नुकसानदायक राहण्याची शक्यता आहे. विनाकारण वाद घालू नयेत. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च कराल. काळजी पूर्वक व्यवहार करा. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क:
आज कामाची पद्धत अवलंबावी लागेल. कोर्टकचेरीची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. प्रकृती कडे दूर्लक्ष करून चालणार नाही. नवीन वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. आर्थिक नियोजानावर वेळेत भर द्या. मित्र मैत्रिणींकडून चांगली साथ लाभेल यात शंका वाटते. काळजी पूर्वक व्यवहार करणे अत्यावश्यक आहे. आर्थिक हानी होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडथळे निर्माण होतील.
सिंह:
आज प्रवासात काळजी घ्यावी. नशिबाची साथ चांगली मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल. जोडीदाराचे सहकार्यही उत्तम मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. विद्याभ्यासात प्रगती कराल. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. व्यापार उद्योग तेजीत राहतील. नावलौकिक वाढेल.
कन्या:
आज फायदे मिळवाल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. उच्च शिक्षणाच्या अभ्यासात जास्त लक्ष घालाल. आनंददायी वातावरण राहील. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होण्याची शक्यता आहे. घर खरेदीची शक्यता आहे. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमत्ता संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल.
तूळ:
आज कामाला जास्त महत्त्व द्याल. खूप नकारात्मक विचार मनात येतील. मनावरचा ताण बर्यापैकी कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचं चांगले सहकार्य मिळणार आहे. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढ राहील. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल.
वृश्चिकः
आज एखाद्या गोष्टीचा लाभ मिळेल, फायदा होईल. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी अंगावर घ्याल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. आर्थिक तरतूद होणार आहे. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची सावधानी बाळगा.
धनु:
आज करिअरमध्ये खूप कष्ट करावे लागतील. आरोग्य बिघडू शकते. स्थावर इस्टेटीचे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. अहंकारी वृत्तीचा त्याग करावा. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. संततीच्या आरोग्याकडे लक्ष द्या. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. जुनी येणी रखडतील. कर्ज प्रकरणे नामंजूर होतील. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण सतर्क राहा.
मकर:
आज कुटुंबात मुलांच्या वागण्यामुळे ताण निर्माण होईल. मानसिक त्रास निर्माण होणाऱ्या घटना घडतील. मनात उदासिनता वाढेल. व्यापारात नवनवीन गोष्टी पुढे येतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. सावधगिरी न बाळगता कोणतेही काम अंगावर घेऊ नका.
कुंभ:
आज आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे अनेक बेत ठरवाल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील. मनोधैर्य सांभाळा. अविचारीपणा योग्य नाही. विचारा अंतीच निर्णय घ्या. शांत चित्त ठेवणाचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये सरकारी अधिकारी वरिष्ठांकडून काही त्रास जाणवेल. कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. क्षाणिक फायद्यासाठी गुंतवणुक करू नका.
मीन:
आज परदेशगमनाच्या संधी मिळतील. नोकरी धंद्याच्या ठिकाणी हवे तसे वातावरण मिळाल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. अनाठायी खर्च होईल. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे. मित्रमैत्रिणींची जपून निवड करावी. व्यापारात उत्पन्न कमी खर्च अधिक होईल. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासुन जाल.