(2 / 12)मेष: आज कौलव करणात आर्थिक घडी थोडी अस्थिर होईल. जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील. परंतु प्रवासात सर्व बाबतीत काळजी घ्यावी लागेल. तुमच्या प्रेमळ आणि मर्यादशील स्वभावाचा इतर लोक फायदा घेणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. घरातील लोकांच्या अरेरावी वागण्यामुळे त्रासून जाल. घरात पाहिजे तेवढे लक्ष द्यायला न जमल्यामुळे घरात सर्वांचीच चिडचिड होईल. मानसिक परेशानी क्लेश उत्पन्न होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्न मन राहील. व्यापारात समस्या निर्माण होतील. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे. आर्थिक हानी होण्याची संभवना आहे. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आरोग्य बाबतीत विशेष काळजी घ्यावी. शुभरंग: नारंगी शुभदिशा: दक्षिण.शुभअंकः ०४, ०६.