Today Horoscope 11 October 2024 : आज सुकर्मा योग आणि बव करण राहील. आज आश्विन अष्टमी-नवमी तिथी असून, नवरात्रचा नववा दिवस आहे, चंद्र धनु राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा शुक्रवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
मेष:
आज कार्यक्षेत्रात ठोस निर्णय घेऊ शकाल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. पैसा निश्चित मिळणार आहे. त्या दृष्टीने पुढे जायला हरकत नाही. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. संधी प्राप्त होतील. व्यापारात नवीन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल.
वृषभः
आज खर्चाला अनेक वाटा फुटतील. आर्थिक बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. वाहने जपून चालवा. तुमच्या स्वतंत्र आचार विचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील. मानापमानाच्या कल्पना जास्त तीव्र होतील. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापा सारख्या घटना घडतील. प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल. केलेल्या कामात अपेक्षेनुसार यश लाभणार नाही. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. संयमाने कामे कण्याचा प्रयत्न करा.
मिथुन:
आज मर्दानी खेळ खेळणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील. कामात यश मिळण्याचे योग आहेत. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. आर्थिक गुंतवणुक करताना विचार पूर्वक करा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरीत कामाप्रती सजग राहा. आळस दुर ठेवा.
कर्कः
आज मन चिंताग्रस्त राहील. काही कामे असतील तर ती रखडतील. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विशेषतः आईच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक ठरेल. स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्ण कराल. कष्टाला आपलेसे केलेत तर यश निश्चित मिळेल. मोठी आर्थिक गुंतवणूक टाळा. मनाची उद्विग्नता वाढेल. महत्वाची कामे शक्यतो आज टाळावीत.
सिंह:
आज विचार अवश्य करावा. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. झोपेच्या तक्रारी डोके वर काढतील. शेअर बाजारात गुंतवणूक करताना अविचार होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. अनिश्चितेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताण तणात्मक राहील. मान अपमानाचे प्रसंग घडतील. शासकीय कामकाजा करिता यशाचा दिवस आहे. कायदेशीर कामात विलंब होईल. महत्वाची कागदोपत्रे सांभाळा.
कन्या:
आज वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. मनःस्तापाचे प्रसंग येतील. गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. परस्पर मतभेद वाढू नयेत याची काळजी घ्या. कोणताही विषय जास्त ताणू नये. विचारपूर्वक नियोजन करून कार्य करा. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. मोठे व्यवहार टाळावेत. मानसिक शारिरिक थकवा जाणवेल.
तूळ:
आज अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. धंद्यात वाढ होईल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. रोजगारात तुमची प्रगती होईल. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेने अधिक लाभ होईल. भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे.
वृश्चिकः
आज कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. कार्यक्षेत्रात तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. स्वत:च्या हिमती वर कामे पूर्णत्वाला न्याल. पैशाची अडकलेली कामे मात्र पार पडतील. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारात फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावधानी बाळगा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढतीची संधी आहे. आहारावर नियंत्रण ठेवावे.
धनु:
आज मनःशांती मिळेल. यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सहलीचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्त्रोत निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. इच्छित फळ मिळेल. कुटूंबात स्नेह वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे.
मकरः
आज प्रवासात वादविवाद टाळा. वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील. अशावेळी मानसिक अस्थिरता जाणवेल. करिअर संबंधी चिंतेत पडाल. मनमानी पद्धतीने काम करण्याची प्रवृती मात्र टाळा. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजी पूर्वक करावेत. आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या.
कुंभ:
आज सहकार्य चांगले मिळणार आहे. आरोग्याबाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत. जवळच्या लोकांना उत्साह वाटेल. प्रकृती अस्वास्थ्य थोडे जाणवेल. पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. नोकरीत दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करु नका. विद्यार्थीवर्गानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील.
मीनः
आज रोजगारात काम करण्यास उत्साह येईल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कामे करताना वेळेचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील.