मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rashi Bhavishya : मत्स्य जंयती व रमजान ईदचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya : मत्स्य जंयती व रमजान ईदचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

Apr 11, 2024 04:00 AM IST Priyanka Chetan Mali

Rashi Bhavishya 11 April 2024 : आज ११ एप्रिल २०२४ गुरुवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी आजचा दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.

आज मत्स्य जंयतीचा चंद्र अहोरात्र सूर्याच्या नक्षत्रातुन आणि मंगळाच्या राशीतुन भ्रमण करणार आहे. चंद्र सूर्याशी संयोग करीत असुन दिनमानावर सूर्याचा विशेष प्रभाव राहील. आयुष्मान योगात कसा जाईल गुरुवार! वाचा राशीभविष्य!
twitterfacebookfacebook
share

(1 / 13)

मेषः आज चंद्रभ्रमण अनुकुल असल्याने आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम ठसा निर्माण करण्यास तुम्ही वरचढ ठरणार आहात. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मूड राहील. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. तुमच्या बुद्धीला विशिष्ट झेप देणारे ग्रहमान असल्यामुळे त्याचा फायदा तुम्ही जरूर करून घेणार आहात. व्यवहारात स्त्रियांच्या मध्यस्थीमुळे मनासारखी कामे होतील. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. शुभरंग: केशरी शुभदिशा: दक्षिण.शुभअंकः ०४, ०७.
twitterfacebookfacebook
share

(2 / 13)

वृषभः आज आयुष्मान योगात करियरमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कलाकारांना कला क्षेत्रातवाव मिळेल पण त्यापासून आर्थिक लाभ मात्र मिळणार नाही. योग्य वेळी पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे थोडी चिडचिड होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. स्वप्नांचा संबंध वास्तवाशी लावण्याचा प्रयत्न करू नये. दिनमान कामाच्या दृष्टीकोनातून कष्टदायक असणार आहे. वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. पारिवारिक सहकार्य लाभणार नाही. नातेसंबंधाविषयी मनात कटुता तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापार रोजगातात काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. शुभरंग: पिवळसर शुभदिशा: ईशान्य.शुभअंकः ०३, ०६.
twitterfacebookfacebook
share

(3 / 13)

मिथुनः आज चंद्राशी होणारा योग पाहता थोडेसे धूर्त संयमितपणा बरोबरच धोरणी रहाल. काही करण्याची खूप स्वप्ने रंगवली असतील. तर त्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याची सवय अंगी बाळगा. हुशारी आणि उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. बौद्धीक क्षेत्रात काम करणारांना चांगल्या संधी मिळतील. स्वभावात थोडा बेपर्वाईपणा राहील. प्रतिकुल परिणाम येण्याची शक्यता आहे. व्यापार उद्योग क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारा सोबत वाद विवाद टाळा. व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. फार ताण घेऊ नका. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी मित्रांची भागीदाराची मदत घ्यावी लागेल. आपल्या स्वभावात चंचलता निर्माण होईल. शुभरंगः निळा शुभदिशाः नैऋत्य.शुभअंकः ०४, ०८.
twitterfacebookfacebook
share

(4 / 13)

कर्कः आज चंद्राचा सूर्याशी संयोग होत आहे. नोकरी व्यवसायात मनासारखे कार्यामुळे तब्येत खूष राहील. सगळीकडे धडाडी दाखवाल आणि लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. ज्यांचे परदेशात व्यवहार आहेत त्यांना तेथून चांगले संकेत मिळाल्यामुळे छोटी ट्रीप करावीशी वाटेल. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. प्रोफेसर यांच्यासाठी शुभदिवस आहे. व्यापारात काही नवीन योजना पूर्णत्वास जातील. शुभरंग: जांभळा शुभदिशा: पश्चिम.शुभअंकः ०६, ०८.
twitterfacebookfacebook
share

(5 / 13)

सिंहः आज चंद्रबल उत्तम असल्याने लोकांना संघटित करण्याबाबत विशेष रूची ठेवाल. राजकारणी लोकांना आपल्या कामामध्ये अडथळे आले तरी चिकाटी ठेवून पुढे नेण्याची जबाबदारी ठेवावी लागेल. प्रेमीजनांना प्रेमप्रकरणातअडथळे संभवतात. कोणत्याही निर्णयात ठामपणा नसल्यामुळे कामाची गती मंदावेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहिल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारी वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लागेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. सहकाऱ्यांसोबतचे वादविवाद मात्र टाळावेत.शुभरंगः पिवळा शुभदिशाः ईशान्य.शुभअंकः ०६, ०९.
twitterfacebookfacebook
share

(6 / 13)

कन्याः आज चंद्र गोचर शुभ स्थानातून होत आहे. एक प्रकारची प्रेरणा आतून निर्माण होईल. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. कल्पनाशक्ती आणि दूरदर्शी पणाच्या जोरावर लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. तुमची अध्यात्मिक साधना फळाला येईल. सामाजिक कार्यात रस घ्याल. गैरसमज, वितंडवादाची गाठोडी मागे टाकून पुढे जाल तर सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. खरेदी- विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्व कराल. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील. शुभरंग: नारंगी शुभदिशा: दक्षिण.शुभअंकः ०१, ०९.
twitterfacebookfacebook
share

(7 / 13)

तूळ: आज चंद्र सुर्याच्या नक्षत्रातून गोचर करणार असून उत्कृष्ट बुद्धीमत्ता आणि अचाट स्मरणशक्ती असल्यामुळे हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. मुळापर्यंत जाऊन अभ्यास करण्याची वृत्ती आणि मुडी स्वभाव यामुळे तुम्ही जरा जगावेगळे वाटता. शिवाय काळाच्या पुढे विचार करणारे असता. कोणत्याही गोष्टीसाठी पराक्रमाची शर्थ कराल. अडचणी येतील. परंतु एकंदरीत यशाकडेच वाटचाल रहाणार आहे. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या भेटी घडतील. कार्य पद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यास अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. शुभरंगः भगवा शुभदिशाः आग्नेय.शुभअंकः ०३, ०६.
twitterfacebookfacebook
share

(8 / 13)

वृश्चिक: आज सूर्याशी होणारा संयोग पाहता व्यवसायात कोणत्याही मोहात न अडकता कामे करण्याला प्राधान्य द्या. इतरांच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागले तरी बाकी कोणत्याही गोष्टीपेक्षा प्रयत्नाला महत्त्व द्यावे लागेल. मुलांच्या आवाक्याबाहेरच्या मागण्यांमुळे वैतागुन जाल. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी पथ्यपाणी सांभाळा. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करणे आवश्यक ठरेल. घराकडे जातीने लक्ष द्याल. स्वभावात राग उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकारवृत्ती मुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. पत्नीच्या प्रकृतीची चिंता सतावु शकते. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल. शुभरंगः पोपटी शुभदिशाः उत्तर.शुभअंकः ०२, ०६.
twitterfacebookfacebook
share

(9 / 13)

धनु: आज चंद्राचं बल लाभल्याने आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे चीज होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रेंगाळण्याची शक्यता आहे. निद्रानाशाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण मानसिक अस्थिरता असू शकते. वाचनाची आवड जोपासाल आणि ज्ञानाचा आनंद घ्याल. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. लेखन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे. शुभरंगः पांढरा शुभदिशाः वायव्य.शुभअंकः ०२, ०७.
twitterfacebookfacebook
share

(10 / 13)

मकरः आज चंद्र शुभ योगात असताना नोकरी व्यवसाया च्या ठिकाणी आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. तुमच्या आनंदात वरिष्ठही सहभागी झाल्यामुळे तुमचा आनंद अधिकच दुणावेल. नवीन संधीचे दान तुमच्या पदरात टाकण्यासाठी येत आहे. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. ज्या कार्याचा निश्चय कराल ती गोष्ट पार पडेपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात.  आपणास उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. मत्सर संवाद टाळावा. कोणाचाही द्वेष करू नका. व्यापार उद्योगात वाढ होईल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. शुभरंगः लालसर शुभदिशाः पूर्व.शुभअंकः ०५, ०९.
twitterfacebookfacebook
share

(11 / 13)

कुंभः आज रविचा चंद्राशी होणारा संयोग पाहता धार्मिक गोष्टी करण्या साठी बराच पैसा खर्च कराल. आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. मोठ्या भावंडांची मदत मिळेल. तुमच्या कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल. बौद्धीक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न सफलदायक ठरतील. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. व्यापारात भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. नोकरीमध्ये अनुकुल बदल होईल. हितशत्रु आणि विरोधकांवर मात कराल. रखडलेल्या कामास गती मिळेल. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहिल. व्यापार रोजगारात अनुकूल असा प्रतिसाद मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी कळेल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शन आणि सहकार्य लाभेल. शुभरंग: हिरवा शुभदिशा: उत्तर.शुभअंकः ०२, ०७.
twitterfacebookfacebook
share

(12 / 13)

मीनः आजच्या चंद्र गोचरात वैवाहिक जीवनात थोडी तडजोड करावी लागेल. अंगात थोडा आळस शिरेल त्यामुळे कामे उरकण्यात थोडी दिरंगाई होईल. भावंडांशी मतभेद संभवतात. शेजाऱ्यांच्या गुप्त कारवायांमुळे त्रासून जाल. घरातील तंग वातावरण काही वेळा त्रासदायक होईल. मुलांच्या मताशी सहमत न झाल्या मुळे तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. व्यापारात फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचन मनानाची गोडी वाढेल. कंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. नोकरीत अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारानिमित्त प्रवास होईल. हानी होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद संभवतात. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. शुभरंग: गुलाबी शुभदिशा: आग्नेय.शुभअंकः ०२, ०७. जय अर्जुन घोडके(jaynews21@gmail.com)(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)
twitterfacebookfacebook
share

(13 / 13)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज