Today Horoscope 10 September 2024 : आज विष्कंभ योग व गरज करण राहील. आज भाद्रपद सप्तमी तिथि आहे, चंद्र वृश्चिक राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा मंगळवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
(Freepik)मेष:
आज व्यापारात परिस्थितीवर मात कराल. कुटुंबातील लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. उद्योग व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत मानाच्या जागा मिळतील. नवीन वाहन खरेदीचे योग आहे. मनावरचा ताण बर्यापैकी कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. महत्त्वाचे निर्णय घेणे निश्चित शक्य होईल. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा.
वृषभ:
आज प्रमोशन मिळण्याचे योग येतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणीं कडून लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. प्रयत्न यशस्वी होईल.
मिथुन:
आज उत्पन्नापेक्षा अधिक खर्च कराल. फसवणुक होण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारावर जास्त विश्वास टाकणे योग्य ठरणार नाही. आर्थिक विवंचना थोडी सतावेल. मौल्यवान वस्तु गहाळ होण्याची शक्यता आहे. विनाकारण वाद घालू नयेत. काळजीपूर्वक व्यवहार करा. आरोग्याची काळजी घ्या.
कर्कः
आज व्यवसाय संबंधी कामे लवकर घडून येतील. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. नोकरीची संधी उपलब्ध होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची काळजी घ्या. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. कामाचा विस्तार होईल. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. रागावर मात्र नियंत्रण ठेवा.
तूळ:
आज कल्पनांचे स्वागत होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. संधी मिळेल. वाहन व घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. नावलौकिक वाढेल. लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पना शक्ती यात सुधारणा होईल. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
वृश्चिक:
आज नाविन्यपूर्ण निर्णय घ्यावे लागतील. परदेशाशी व्यवहार असणाऱ्यांना फायदेशीर ठरेल. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. लाभ होईल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे. कुटुंबात शुभवार्ता मिळेल.
धनु:
आज आर्थिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापारात तोट्याचे प्रमाण वाढेल. आर्थिक लाभ चांगले होतील. माणसं दुरावली जातील असी वर्तणुक टाळावी. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. जुनी येणी रखडतील. कर्ज प्रकरणे नामंजूर होतील. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण सतर्क राहा.
मकर:
आज थोडे गैरसमज होण्याची शक्यता आहे. यश संपादन करण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. व्यापारात नवनवीन गोष्टी पुढे येतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. पत्नी जोडीदाराच्या आरोग्याची समस्या चिंतीत करणारी ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कठीण प्रसंगाशी झगडावे लागेल.
कुंभ:
आज गुंतवणूक करू नका. आरोग्याच्या दृष्टीने जुनी दुखणी त्रास देतील. पथ्यपाणी सांभाळणे हिताचे ठरेल. विचारा अंतीच निर्णय घ्या. कार्यक्षेत्रात आपल्या विषयी गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घ्या. कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. उताविळ पणाने कोणत्याही गोष्टी करू नका.
मीन:
आज पैशाचे पाठबळ चांगले मिळेल. अनाठायी खर्च होईल. व्यापारात उत्पन्न कमी खर्च अधिक होईल. आनंदावर विरजण पडण्या सारख्या घटना घडतील. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. आजारपणाने त्रासुन जाल. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे.
सिंहः
आज आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. जोडीदाराचे सहकार्य उत्तम राहील. नोकरी व्यवसायात हव्या असलेल्या संधी मिळतील. संधीचा लाभ घ्यावा. आपल्यावरील कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नवीन वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. नवनविन प्रलोभने येत राहतील. काळजी पूर्वक व्यवहार करणे अत्यावश्यक आहे.
कन्याः
आज अनावश्यक चिंता तुमचा पाठलाग करतील. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होण्याची शक्यता आहे. घर खरेदीची शक्यता आहे. व्यवसाया निमित्त प्रवास होईल.