Astrology prediction today 10 October 2024 : आज १० ऑक्टोबर २०२४ रोजी, आश्विन सप्तमी-अष्टमी तिथी असून, चंद्र धनु राशीतुन भ्रमण करत आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी गुरुवारचा दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
(1 / 13)
Today Horoscope 10 October 2024 : आज अतिगंड योग आणि विष्टि करण राहील. आज आश्विन सप्तमी-अष्टमी तिथी असून, नवरात्रचा आठवा दिवस आहे, चंद्र धनु राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा गुरुवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
(2 / 13)
मेषः आज भावंडांशी मतभेद संभवतात. घरातील तंग वातावरण काही वेळा त्रासदायक होईल. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. विद्याभ्यासात प्रगती होईल. कंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. नोकरीत अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल. व्यापारानिमित्त प्रवास होईल. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास जाणवेल.
(3 / 13)
वृषभः आज खूप स्वप्ने रंगवली असतील. यशाला खेचून आणाल. चांगल्या संधी मिळतील. स्वभावात थोडा निष्काळजीपणा राहील. व्यापार उद्योग क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारा सोबत वाद विवाद टाळा. व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. फार ताण घेऊ नका. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे.
(4 / 13)
मिथुन: आज कामामध्ये अडथळे आले तरी काम जबाबदारीने पूर्ण करावं लागेल. प्रेमीजनांना प्रेमप्रकरणात अडथळे संभवतात. कोणत्याही निर्णयात ठामपणा नसल्यामुळे कामाची गती मंदावेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
(5 / 13)
कर्क: आज प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. सामाजिक कार्यात रस घ्याल. गैरसमज मागे टाकून पुढे जाल तर सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मक परिणाम दिसतील. इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे.
(6 / 13)
सिंहः आज हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. अडचणी येतील. यशाकडेच वाटचाल राहणार आहे. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. प्रसन्न वातावरण राहणार आहे.
(7 / 13)
कन्याः आज तुमचा आनंद अधिकच दुणावेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात. उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. पत्नीसोबत गोडी व दुरावा असे दोही फळे अनुभवास येतील.
(8 / 13)
तूळ: आज आर्थिक स्थिती सुधारेल. लाभदायक दिवस आहे. मानसन्मानाचे योग येतील. प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. व्यापारात भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. रखडलेल्या कामास गती मिळेल. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहील. गुंतवणूक लाभ देणार आहे.
(9 / 13)
वृश्चिकः आज वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक लाभ मात्र मिळणार नाही. थोडी चिडचिड होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. अर्थप्राप्तीत अडथळे निर्माण होतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
(10 / 13)
धनुः आज मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. तुमच्या बुद्धीला विशिष्ट झेप देणारे ग्रहमान असल्यामुळे त्याचा फायदा तुम्ही जरूर करून घेणार आहात. मनासारखी कामे होतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल.
(11 / 13)
मकरः आज कार्यामुळे तब्येत खूष राहील. लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. मोठी पदप्राप्ती मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल.
(12 / 13)
कुंभः आज कामे करण्याला प्राधान्य द्या. वैतागुन जाल. पथ्यपाणी सांभाळा. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करणे आवश्यक ठरेल. घराकडे जातीने लक्ष द्याल. स्वभावात राग उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा.
(13 / 13)
मीनः आज स्थावर इस्टेटीचे प्रश्न रेंगाळण्याची शक्यता आहे. वाचनाची आवड जोपासाल आणि ज्ञानाचा आनंद घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल.