Today Horoscope 10 July 2024 : विपरित ग्रहणयोग घटीत होत आहे. हा योग कोणाकरिता फायदेशीर राहील, कसा जाईल बुधवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
मेष:
आज परदेशी गोष्टी खरेदीचे योग येतील. नवीन विचारांचे स्वागत होईल. आर्थिक निर्णय जबाबदारीने घ्यावे लागतील. समानसिक स्वास्थ सांभाळा. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. अंहकारवृत्ती मुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. कर्ज प्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा.
वृषभ:
आज कुटुंबासोबत दुरवरच्या प्रवासाचं नियोजन कराल. धंद्यात चांगली प्रगती कराल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. आरोग्याच्या थोडयाफार समस्या उद्भवतील.
मिथुन:
आज कौतुकास पात्र ठराल. संधी मिळेल. उत्तम कलाकृतीसाठी कौतुकास पात्र ठराल. योग्य समयसूचकता दिसून येईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहील. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल.
कर्क:
आज नोकरी बदलाचे योग आहेत. शेअर मार्केट मध्ये पैसा मिळेल. बौद्धीक आणि कलेच्या क्षेत्रात उत्तम प्रगती कराल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. इच्छेप्रमाणे कार्य घडतील. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील.
सिंहः
आज कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळेल. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. नावलौकिक वाढेल. अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल.
कन्याः
आज अती आत्मविश्वासामुळे तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता आहे. घरामध्ये स्फूर्तीदायक वातावरण निर्माण होईल. व्यापार उद्योग क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारा सोबत वाद विवाद टाळा. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. मनावर नियंत्रण ठेवून संयम राखावा.
तूळ:
आज परदेशगमनाचे योग येतील. बौद्धीक क्षेत्रात प्रगतीच्या संधी निर्माण होतील. पाठीची दुखणी डोके वर काढतील. प्रयत्नांना यश लाभेल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. कामानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. विरोधकांवर मात कराल. रखडलेल्या कामास गती मिळेल. आनंदाची बातमी कळेल.
वृश्चिकः
आज विवाह इच्छूकांचे विवाह ठरतील. जोडीदार उत्तम आणि सुसंस्कृत मिळेल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तेवढाच खर्चिकपणाही वाढेल. फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचन मनानाची गोडी वाढेल. कंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. नोकरीत अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल. कुटुंबात मतभेद संभवतात. मानसिक त्रास जाणवेल.
धनुः
आज जोडीदाराचे सहकार्य उत्तम मिळेल. आर्थिक फायदा चांगला होईल. कामाचे उत्तम नियोजन कराल. स्वत:ची कामे स्वतःच केलेली बरी पडतील. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल.
मकरः
आज मन:स्वास्थ्य मिळणार नाही. खर्चात वाढ होईल. वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. अर्थप्राप्तीत अडथळे निर्माण होतील. आशावादी दृष्टीकोनातून सतत विचार करावा. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. आर्थिक हानीची शक्यता आहे.
कुंभः
आज घरामध्ये अचानक एखाद्या गोष्टीला तोंड द्यावे लागेल. भाग्याची साथ चांगली मिळेल. मूड चांगला राहील. उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल.
मीनः
आज कुटुंबाची साथ तुम्हाला चांगली मिळणार आहे. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. मोठी पदप्राप्ती, मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. नवीन योजना पूर्णत्वास जातील. मित्रमंडळींचे सहकार्य लाभणार आहे. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधाच्या कामाला गती येईल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे.