Astrology prediction today 10 August 2024 : आज ११ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी, श्रावण शुक्ल षष्ठी तिथी आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
(1 / 13)
Today Horoscope 10 August 2024 : साध्य योग व कौलव करण असून, आज श्रावण श्रीयाळ षष्ठी व्रत आहे, योग-संयोगात कसा जाईल आजचा श्रावण शनिवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
(2 / 13)
मेषः आज कौटुंबिक जीवनात समृद्धी लाभेल. आकस्मिक लाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील.
(3 / 13)
वृषभः आज व्यवसायाशी संबंधित कोणतीही गोष्ट शेअर करणे टाळा. चुकीच्या संगतीमुळे आळ येतील. नोकरी व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. अडचणी येऊ शकतात. कामांना गती येईल. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. मानहानी खोटे आरोप याला सामोरे जावे लागेल.
(4 / 13)
मिथुनः आज नोकरीत ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरता मेहनत कराल. घरामध्ये एकमेकांच्या विचारांची तफावत जाणवेल. नोकरीत व्यापारात आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. गुंतवणुकी साठी दिवस उत्तम राहील. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. पत्नीकडून सहकार्य लाभेल. पद प्रतिष्ठा लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत.
(5 / 13)
कर्क: आज देवाण घेवाणीपूर्वी कागदपत्रे वाचा. क्षुल्लक कारणा वरून वाद घालू नका. नव्या नोकरीचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. घरात तुमचे धोरण सबुरीचे ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिड पणा राहिल. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्भवतील. अतिरिक्त ताण जाणवेल. मोठी गुंतवणूक आज करू नये. मित्रमैत्रिण नातेवाईकांसोबत सलोख्याने वागा. प्रकृती वर लक्ष द्या.
(6 / 13)
सिंहः आज नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम न झाल्याने कामाची पद्धत बदलावी लागेल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये. आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील.
(7 / 13)
कन्याः आज नोकरीत हक्क आणि अधिकारासाठी लढा द्यावासा वाटेल. सवलतींचा उपयोग योग्य कारणा करताच करावा. मनातील संयशावृती वाढेल. भावनेवर नियंत्रण ठेवा. नोकरी बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. शासकीय कामकाजात अडचणीत आणणारे दिनमान राहील. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा.
(8 / 13)
तूळ: आज आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. धन संचय करा. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. मान प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र त्याग करा. ध्येय निश्चित करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लाभेल. सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे.
(9 / 13)
वृश्चिकः आज मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. भावंडाची योग्य साथ मिळेल. नविन संधी आपल्याला मिळणार आहे. सौभाग्य योगात वृद्धी होईल. आर्थिक बाबती मधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. यशस्वी व्हाल. नवीन संधी व मानधनात वाढ होईल.
(10 / 13)
धनुः आज नोकरीत नेहमीपेक्षा जादा काम करावे लागेल. सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साह वर्धक व आंनदायक राहील. आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल.
(11 / 13)
मकर: आज संतती विषयी चिंता मिटेल. जमीन खरेदी विक्री तून अधिक लाभ होईल. आर्थिक स्थिती उत्तम होईल. आपल्या वाणीचा आणि व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरावर पडेल. कुटुंबामधून आपणास सुवर्ता मिळणार आहे. आपल्याला अपेक्षीत व्यवहार योग्य रित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. व्यापारी वर्गास खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश लाभेल.
(12 / 13)
कुंभ: आज आरोग्याची काळजी घ्या. योग व व्यायामात सातत्य ठेवा. खर्चाला लगाम घाला. कौटूंबिक नात्यामध्ये दूरावा येण्याचे योग आहे. आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. विरोधक डोके वर काढतील. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थाची काळजी घ्या.
(13 / 13)
मीनः आज वडिलधाऱ्या व्यक्तीपासून आर्थिक लाभ होतील. नोकरीत असाल तर बढतीचे योग आहेत. आत्मविश्वास वाढीस लागेल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. मित्रमैत्रिणी नातेवाईका कडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहील. स्वभावातील गुणदोषं मात्र टाळावेत.