Astrology prediction today 1 September 2024 : आज १ सप्टेंबर २०२४ रोजी, शेवटचा श्रावण रविवार आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
(1 / 13)
Today Horoscope 1 September 2024 : आज परिघ योग आणि विष्टी करण असून, आज श्रावण चतुर्दशी आहे, योग-संयोगात कसा जाईल आजचा महिन्याचा शेवटचा रविवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
(2 / 13)
मेष: आज घरात वादाचे प्रसंग निर्माण होतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. आरोग्याची समस्या चिंतीत करणारी ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. सावधगिरी न बाळगता कोणतेही काम अंगावर घेऊ नका. भावंडांबरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात त्रास होतील. अन्यथा अडचणी वाढतील. आजाराकडे दुर्लक्ष करू नये.
(3 / 13)
वृषभ: आज मन उत्साह राहील. अपेक्षांचे ओझे सहन करणे तुम्हाला कठीण जाईल. तडजोड थोडी मनाविरुद्ध असेल. अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण करेल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. व्यवसायात अनुकूल अपेक्षित घटना घडतील. संततीकडून समाधान लाभेल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल.
(4 / 13)
मिथुनः आज रागावर नियंत्रण ठेवा. मन प्रसन्न राहील. प्रवासाचे योग आहेत. कामात मात्र कसूर करू नये. ज्ञान आणि शक्ती याचा योग्य समन्वय साधाल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जास्त काम करावे लागेल. महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिवस आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल.
(5 / 13)
कर्क: आज लाभ मिळणार नाही. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तब्बेतीची काळजी घ्या. वेळेवर औषधोपचार घ्या. मानसिक चिडचिड दगदग होईल. विरोधकांचा त्रास सहन करावा लागणार आहे. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. मानसिक त्रासातुन जावे लागेल.
(6 / 13)
सिंह: आज आर्थिक गुंतवणूक कराल. मित्र परिवारामध्ये रमाल. बौद्धीक कसरती करण्याबरोबरच मनोरंजन करण्याकडेही कल राहील. धंद्यात नवीन ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे. नेहमीच्या दिनचर्येत अडचणी येतील. अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. धनलाभाची संधी मिळेल. आर्थिक स्त्रोत वाढेल.
(7 / 13)
कन्याः आज तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे. परदेश गमनाचे किंवा लांबच्या प्रवासाचे योग येतील. अभ्यासात प्रगती करून घेता येईल. खूप दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील. नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. घाईगडबडीमुळे अडचणीत येऊ शकतात. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. अनुकुल घटना घडतील.
(8 / 13)
तूळ: आज आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. समाजात प्रतिष्ठा मिळेल. उत्साही वातावरण राहील. परदेशगमनाच्या संधी येतील. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. योग्य निर्णयामुळे यश लाभेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. शुभवार्ता ऐकायला मिळेल. लाभ होईल. जोडीदाराकडून गृहसौख्य उत्तम मिळेल. मन प्रसन्न राहील. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल.
(9 / 13)
वृश्चिक: आज कुटुंबासाठी एखादा त्याग करावा लागेल. तुमच्या नवीन कल्पनांच स्वागत होईल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. कामानिमित्त केलेल्या दुरवरच्या प्रवासातून लाभ होतील. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. पत्नी व पुत्र यामुळे काहीसा मानसिक त्रास सोसावा लागेल.
(10 / 13)
धनु: आज व्यवसायात पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. विद्यार्थी वर्गासाठी नक्षत्र अनुकुल आहे. वास्तु खरेदी विक्रीतून फायदा होईल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे. निराशा पदरात पडेल. पण आर्थिक प्रश्न सुटतील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. अपेक्षित यश संपादन करता येईल. दिवस शुभ लाभदायी असणार आहे.
(11 / 13)
मकर: आज तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. मधुमेहाचा विकार आहे त्यांनी पथ्य पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या कामाचे चिज होणार नाही. कौटुंबिक चिंता निर्माण होईल. दिवस ताणतणाव निर्माण करणारा आहे. व्यापारात पद प्रतिष्ठा सांभाळा. उधारी वसुलीत खडतर परिस्थितीचा सामना करावा लागेल. मनाप्रमाणे घटना घडणार नाहीत.
(12 / 13)
कुंभः आज धनप्राप्तीचा योग आहे. कोणतेही व्यसन ताब्यात ठेवले नाही तर प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. प्रकृतीच्या जुन्या तक्रारी पुन्हा उद्भवतील. आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचार पूर्वक करणे गरजेचे राहील. तात्पुरते फायदे लक्षात घेऊ नयेत. चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
(13 / 13)
मीन: आज आर्थिक खोळंबलेली कामे मार्गी लागतील. पण कुटुंबात काहीसा वादविवाद होणारा दिवस ठरेल. कर्ज घेण्यापासून दूर राहा. मनस्वास्थ बिघडण्याचा शक्यता आहे. मानहानी होण्याची संभावना आहे. शांत व विवेक बुद्धीने कार्य करावे. मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत. जोडीदारासोबत सामंजस्यपूर्ण वागा. सांभाळून राहा.