Astrology prediction today 1 October 2024 : आज १ ऑक्टोबर २०२४ रोजी, भाद्रपदातील चतुर्दशी श्राद्ध असून, चंद्र सिंह व कन्या राशीतुन भ्रमण करत आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
(1 / 13)
Today Horoscope 1 October 2024 : आज शुक्ल योग आणि विष्टी करण राहील. आज भाद्रपदातील चतुर्दशी श्राद्ध आहे, चंद्र सिंह व कन्या राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा मंगळवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
(2 / 13)
मेष: आज धनलाभ संभवतो. मान सन्मान मिळेल. पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मन प्रसन्न राहील. समस्या दूर होतील. परदेशगमन खूप फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक बाबतीत मात्र पैसा जास्त खर्च होणार आहे. त्याची मानसिक तयारी ठेवावी लागेल. प्रसिद्धीचे योग येतील. परमेश्वरावर विशेष आस्था निर्माण होईल. तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे.
(3 / 13)
वृषभः आज प्रयत्न यशस्वी ठरतील. घरातील वातावरण आनंदी राहील. कार्यभाग बुडाला म्हणून समजा. मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागू शकतो. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजना मनामध्ये राबवाल आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवाचे रान करायची तयारी ठेवाल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. व्यावसायिकांनी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्या.
(4 / 13)
मिथुन: आज बौद्धिक कसरती करण्यापेक्षा व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्या. जुनी येणी वसूल होतील. घरामध्ये एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून इतरांची मने जिंकाल. एखादी मस्त खरेदी करण्याचा मूड राहील. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील.
(5 / 13)
कर्क: आज आर्थिक बाबतीत व्यवहार काळजीपूर्वक करा. फायदा नुकसानीच्या घटना घडतील. अविचाराने कर्ज काढू नका. हप्ते फेडताना त्रास होईल. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. कुटुंबातील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागण्याची शक्यता आहे. कुटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास जाणवेल.
(6 / 13)
सिंह: आज प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी. कलाकारांना चांगला वाव मिळेल. लोकांची दाद चांगली मिळेल. आपल्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. आर्थिक गुंतवणूक फायदेमंद सिद्ध होईल. व्यापारात कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल.
(7 / 13)
कन्याः आज मनःस्तापाचे प्रसंग येतील. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक कराल. धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. मित्र परिवारामध्ये रमाल. भांडण वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. कार्यक्षेत्रात उर्जा कमी राहील.
(8 / 13)
तूळ: आज अनेक घटना घडतील. भावंडे मदत करतील. आध्यात्मिक उन्नती होऊन उपासनाही चांगली होईल. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. मानधनात वाढ होईल. मान सन्मान पदवी पुरस्कार मिळेल. व्यापारात आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. इच्छे प्रमाणे कार्य घडतील.
(9 / 13)
वृश्चिकः आज मोठा आर्थिक लाभ घडेल. लाभदायक दिवस आहे. कामाचा दर्जा सुधारेल. मतांवर ठाम राहणार आहात. कामाचीगती वाढवण्यासाठी याचा निश्चित उपयोग होऊ शकतो. नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल.
(10 / 13)
धनुः आज धाडसी निर्णय घ्याल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले भांडण मतभेद दूर होऊ शकतील. व्यापारात आर्थिक वृद्धी होईल. मित्र आणि भागीदाराकडून सहकार्य लाभेल. परदेशगमनाचे योग आहेत. व्यापारीवर्गाला आर्थिक फायद्याचा दिवस आहे. आनंदी व ऊत्साही राहाल.
(11 / 13)
मकर:आज भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. अन्यथा तोट्याचे प्रमाण वाढेल. वैवाहिक जीवनात अचानक काही घटना घडू शकतात. आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. हातुन निसटलेल्या संधी पुन्हा प्राप्त होतील. मोठी पदप्राप्ती मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. मित्रमंडळींचे व कुटुंबा तील सदस्यांचे सहकार्य लाभणार आहे.
(12 / 13)
कुंभ: आज पूर्वी केलेली गुंतवणूक धंद्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. मानसिक दृष्टीकोनातून तणाव जाणवेल. अडचणीत आणणारा दिवस आहे. मानसिक स्वास्थ सांभाळा. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता येईल. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा.
(13 / 13)
मीनः आज तापट पणा वाढेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. भागीदारासोबत वादविवाद टाळा. व्यापार व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. व्यवहार करताना जपून करावेत. दुर्घटना गंभीर दुखापतीची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा.