मेष :
प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस खूप रोमँटिक असेल. एकमेकांशी चांगले वागल्याने प्रेम आणखी वाढेल. हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण आहे. विवाहितांसाठी दिवस चांगला राहील.
वृषभ :
आज कोणीतरी खास भेटू शकते. तुमचे प्रेम फुलेल. जोडीदाराच्या प्रत्येक गरजेची पूर्ण काळजी घ्या. तुम्ही दोघेही घरी एक छोटी पार्टी आयोजित करू शकता.
मिथुन:
या राशीचे प्रेमी आता त्यांच्या प्रेमातील अडथळ्यांवर मात करतील ज्यांना ते गेल्या काही दिवसांपासून सामोरे जात आहेत. तुमच्या जोडीदारासोबत पूर्ण रोमान्स करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल. मित्रांसोबत मजेत दिवस घालवाल.
कर्क :
आज प्रेमी युगल भविष्यासाठी नियोजन करण्यात बराच वेळ घालवतील. तुमच्या जोडीदाराचा आनंद आज तुमची पहिली प्राथमिकता असेल. तुमच्या जोडीदाराला प्रत्येक क्षणी रोमँटिक वाटण्यासाठी तुम्ही आज कोणतीही कसर सोडणार नाही.
सिंह :
आजचा दिवस तुमच्या प्रेमप्रकरणात संमिश्र राहील. खूप दिवसांपासून तुमच्यावर रागावलेल्या तुमच्या मित्र/मैत्रिणीला मनवायला पूर्ण दिवस लागेल. छान भेटवस्तू देऊन आनंदी करण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात आज कटुता येऊ शकते.
कन्या :
ज्यांना एखादा व्यक्ती आवडतोय आणि आपले प्रेम व्यक्त करण्यास घाबरताय त्यांनी आज न डगमगता प्रपोज करावे. आज प्रियजनांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आज काहीतरी नवीन प्रयत्न करण्यात तुम्हाला यश मिळेल.
तूळ :
तुमच्या जोडीदाराला रोमँटिक ठिकाणी कुठे घेऊन जायचे या चिंतेत असाल तर ही समस्या आज दूर होईल. रोमान्ससाठी तुमच्याकडे भरपूर वेळ असेल. आज तुम्हाला अनेक आनंदाचे क्षण मिळतील.
वृश्चिक :
आज तुम्हाला प्रेमात काही अडचणी येऊ शकतात. तुमच्या बोलण्याने तुमचा जोडीदार दुखावला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमच्या जोडीदाराशी काही मतभेद होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आवडी-निवडीची पूर्ण काळजी घ्यावी लागेल.
धनु:
तुमची ग्रहस्थिती सूचित करते की, तुमचे नाते अतूट असेल. दैनंदिन जीवनातून विश्रांती घ्या आणि आपल्या सोबत्याला संतुष्ट करण्याच्या मार्गांचा विचार करा. आपल्या मोहकतेने सर्वांचे मन जिंकण्याची आणि नवीन नातेसंबंध निर्माण करण्याची हीच वेळ आहे.
मकर:
तुमचे सध्याचे नाते एका तेजस्वी प्रकाशासारखे आहे आणि तुम्ही दोघेही सध्या एकत्र सोनेरी क्षण घालवत आहात. तुमचे भूतकाळातील नाते विसरा आणि भविष्याकडे वाटचाल करा.
कुंभ :
आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल. जोडीदारासोबत काही खास योजनांची चर्चा होऊ शकते जेणेकरून भविष्यात दोघांनाही फायदा होईल.