Cyclone Remal: रेमल चक्रीवादळाचा भारत आणि बांगलादेशला तडाखा, लाखो नागरिकांचे स्थलांतर, वीजपुरवठा खंडित
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Cyclone Remal: रेमल चक्रीवादळाचा भारत आणि बांगलादेशला तडाखा, लाखो नागरिकांचे स्थलांतर, वीजपुरवठा खंडित

Cyclone Remal: रेमल चक्रीवादळाचा भारत आणि बांगलादेशला तडाखा, लाखो नागरिकांचे स्थलांतर, वीजपुरवठा खंडित

Cyclone Remal: रेमल चक्रीवादळाचा भारत आणि बांगलादेशला तडाखा, लाखो नागरिकांचे स्थलांतर, वीजपुरवठा खंडित

Published May 28, 2024 07:55 AM IST
  • twitter
  • twitter
  • Cyclone Remal: रेमल चक्रीवादळाचा भारत आणि बांगलादेशला मोठा तडाखा बसला. या वादळामुळे लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. तर अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. रेमल वादळाचा प्रभाव बिहारमध्ये दिसला आहे. अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.
रेमाल चक्रीवादळाचा फटका हा  बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला बसला. सोमवारी देखील या वादळामुळे  ताशी १३५  किलोमीटर वेगाने  वारे धडकले. या वादळाचा  परिणाम बिहारमध्येही दिसून आला.  काल रात्री चक्रीवादळ धडकल्यापासून बांगलादेशात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर पश्चिम बंगालमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब कोसळली. तर झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. 
twitterfacebook
share
(1 / 10)

(REUTERS)
सोमवारी बिहारमधील नऊ जिल्ह्यांतील १०  शहरांमध्ये मध्यम ते हलका पाऊस झाला. या काळात ताशी ३०  ते ४०  किलोमीटर वेगाने वारेही वाहत होते. उत्तर बिहार, कोसी, सीमांचल आणि पूर्व बिहारमधील बहुतांश शहरे ढगाळ राहिली, तर पाटणासह बहुतांश शहरांमध्ये कमाल पारा घसरला. बांगलादेशातील अधिकाऱ्यांनी अपघात टाळण्यासाठी अनेक भागांचा वीजपुरवठा आधीच बंद केला आहे, तर अनेक किनारपट्टीवरील शहरे अंधारात आहेत, कारण झाडे आणि तुटलेल्या लाईनमुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे, अशी माहिती ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
twitterfacebook
share
(2 / 10)

(Saikat Paul)
हवामान खात्यानुसार, रेमलचा प्रभाव उत्तर बिहारमध्ये मंगळवारीही दिसून येईल. मात्र, दक्षिण बिहारमधील बहुतांश जिल्हे रात्रीच्या उष्णतेच्या तडाख्यात राहतील. पूर्वेकडील वाऱ्यामुळे वातावरणात आर्द्रता अधिक आहे. त्यामुळे लोकांना प्रत्यक्ष पारा २ ते ३ अंशांनी घासारणार आहे. कोलकात्यात रेमल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पवसातून मार्ग काढत असतांना  तीनचाकी वाहने. 
twitterfacebook
share
(3 / 10)

(AFP)
सुपौलच्या वीरपूरमध्ये ८.४  आणि राघोपूरमध्ये ३, नवाडाच्या कौवाकोलमध्ये ८, पूर्व चंपारणच्या सुगौलीमध्ये ६.२, कटिहारच्या अहमदाबादमध्ये ४.२, शेखपुरामध्ये ३.५, पश्चिम चंपारणच्या वाल्मिकीनगरमध्ये ०.६, मीमी पावसाची नोंद झाली.  रेमल चक्रीवादळामुळे २१ तासांपासून लाइट बंद होती. तर  कोलकाता विमानतळावरील विमानसेवा सोमवारी पूर्ववत करण्यात आली. 
twitterfacebook
share
(4 / 10)

(ANI)
रेमालमुळे पाटणासह ३१  शहरांच्या कमाल तापमानात घसरण झाली. चार शहरांतील तापमानात वाढ झाली. राज्यातील सर्वात उष्ण जिल्हा ४३.३ अंश सेल्सिअससह बक्सर होता.   गोपालगंजमध्ये ४१.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवल्या गेले. १०  शहरांमध्ये कमाल तापमान ४० अंशांपेक्षा जास्त होते. पाटण्यात कमाल तापमान १.४  अंशांनी घसरले. राजधानीचे कमाल तापमान ३८.६ अंशांवर पोहोचले. कोलकात्यात रविवारी सकाळी ८.३० ते सोमवारी पहाटे ५.३० या कालावधीत १४६ मिमी पावसाची नोंद झाली.
twitterfacebook
share
(5 / 10)

रेल्वेने दोन गाड्यांचे संचालन रद्द केले. जोगबनी-सिलिगुडी टाउन (१५७२३/१५७२४) ट्रेन २७ आणि २८ मे रोजी रद्द राहील. रेमाल चक्रीवादळामुळे बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये झालेल्या अपघातात १६  जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी बांगलादेशात दहा जणांचा मृत्यू झाला. चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि त्याच्या किनारी भागात मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे रविवारी रात्री ताशी १३५ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. 'रेमाल' चक्रीवादळ सोमवारी सकाळी कमकुवत झाले आणि रविवारी मध्यरात्री च्या सुमारास धडकल्यानंतर ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते.
twitterfacebook
share
(6 / 10)

(PTI)
हवामान बदलाचा आंब्यावर परिमाण. पावसामुळे आंब्याची गोडी वाढते, त्यामुळे आंबा चविष्ट बनतो, असे कृषी शास्त्रज्ञ पी.के. द्विवेदी यांनी सांगितले. एवढेच नाही तर पावसामुळे आंब्यातून उष्णता निघू लागते. त्यामुळे आंबा लवकर पिकतो, जो आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. सध्या पावसामुळे आंब्याला नुकसान होण्याऐवजी फायदाच होत आहे. मात्र जोरदार वाऱ्यामुळे काही आंबे गळून पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. रेमल चक्री वादळ बांगलादेशातील मोंगला बंदर आणि लगतच्या सागर बेटांच्या किनारपट्टीभागात पोहोचले आहे.  वाऱ्याचा वेग ताशी १३५ किमी (सुमारे ८४ मैल) इतका आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) दिली.
twitterfacebook
share
(7 / 10)

कोलकात्यातील प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी स्थानिक वेळेनुसार रात्री नऊ च्या सुमारास हे चक्रीवादळ भारतात दाखल झाले आणि सुमारे पाच तास सुरू होते.
twitterfacebook
share
(8 / 10)

बांगलादेशने रविवारी सकाळपासून मोंगला आणि चटगांव या बंदरभागातून आणि किनारपट्टीवरील नऊ जिल्ह्यांमधून सुमारे आठ लाख लोकांना स्टॉर्म शेल्टरमध्ये हलवले 
twitterfacebook
share
(9 / 10)

(AP)
भारतातील १,१०,००० लोकांना निवारा केंद्रांमध्ये नेण्यात आले आहे.
twitterfacebook
share
(10 / 10)

इतर गॅलरीज