मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  CWG2022 : मीराबाई ते साक्षी,सिंधूपर्यंत, या खेळाडूंनी केली गोल्डन कामगिरी

CWG2022 : मीराबाई ते साक्षी,सिंधूपर्यंत, या खेळाडूंनी केली गोल्डन कामगिरी

Aug 08, 2022 10:03 PM IST Suraj Sadashiv Yadav
  • twitter
  • twitter

  • कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने एकूण २२ सुवर्णपदके पटकावली. तर पदकतालिकेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि कॅनडा यांच्यानंतर भारत चौथ्या स्थानी राहिला.

 भारताची वेटलिफ्टर मिराबाई चानू हिनं ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 22)

 भारताची वेटलिफ्टर मिराबाई चानू हिनं ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

२०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने इतिहास रचला. लॉन बॉल्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. भारताने या स्पर्धेत पदक जिंकण्याची ९२ वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, तेही थेट सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळाले आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 22)

२०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने इतिहास रचला. लॉन बॉल्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. भारताने या स्पर्धेत पदक जिंकण्याची ९२ वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, तेही थेट सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळाले आहे.

जेरेमी लालरिनुंगाने भारताला दुसरं सुवर्णपदक जिंकून दिलं. त्याने वेटलिफ्टिंगमध्ये ६७ किलो वजनी गटात ३०० किलोग्रॅम वजन उचलत सुवर्णपदकावर नाव कोरलं.
twitterfacebookfacebook
share

(3 / 22)

जेरेमी लालरिनुंगाने भारताला दुसरं सुवर्णपदक जिंकून दिलं. त्याने वेटलिफ्टिंगमध्ये ६७ किलो वजनी गटात ३०० किलोग्रॅम वजन उचलत सुवर्णपदकावर नाव कोरलं.(फोटो - पीटीआय)

अचिंता शेऊलीने पुरुषांच्या ७३ किलो वजनी गटात स्नॅच राऊंडमध्ये १४३ किलो तर क्लिन अँड जर्क राउंडमध्ये १७० किलो वजन उचललं. त्याने एकूण ३१३ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं.
twitterfacebookfacebook
share

(4 / 22)

अचिंता शेऊलीने पुरुषांच्या ७३ किलो वजनी गटात स्नॅच राऊंडमध्ये १४३ किलो तर क्लिन अँड जर्क राउंडमध्ये १७० किलो वजन उचललं. त्याने एकूण ३१३ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं.(फोटो - एपी)

पुरुषांच्या टेबल टेनिसच्या फायनलमध्ये भारताने सिंगापूरला ३-१ ने पराभूत केलं. भारताच्या शरथ कमल, जी साथियान आणि हरमीत देसाई या तिघांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं.
twitterfacebookfacebook
share

(5 / 22)

पुरुषांच्या टेबल टेनिसच्या फायनलमध्ये भारताने सिंगापूरला ३-१ ने पराभूत केलं. भारताच्या शरथ कमल, जी साथियान आणि हरमीत देसाई या तिघांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं.(AP)

पॉवर लिफ्टिंगमध्ये पुरुषांच्या हेवीवेट गटात सुधीरने सुवर्णपदक जिंकलं. कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा सुधीर पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 22)

पॉवर लिफ्टिंगमध्ये पुरुषांच्या हेवीवेट गटात सुधीरने सुवर्णपदक जिंकलं. कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा सुधीर पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.(फोटो - एपी)

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या बजरंग पुनियाने कुस्तीमध्ये ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवलं. त्याने अंतिम लढतीत कॅनडाच्या लाचलान मॅकनीलला ९-२ ने पराभूत केलं.
twitterfacebookfacebook
share

(7 / 22)

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या बजरंग पुनियाने कुस्तीमध्ये ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवलं. त्याने अंतिम लढतीत कॅनडाच्या लाचलान मॅकनीलला ९-२ ने पराभूत केलं.

साक्षी मलिकने ६२ किलो वजनी गटात कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवलं. तिने अंतिम लढतीत कॅनडाच्या एना गोंजालेसला पराभूत केलं.
twitterfacebookfacebook
share

(8 / 22)

साक्षी मलिकने ६२ किलो वजनी गटात कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवलं. तिने अंतिम लढतीत कॅनडाच्या एना गोंजालेसला पराभूत केलं.(AFP)

दीपक पुनियाने ८६ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. त्याने अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद इनामला ३-० ने पराभूत केलं.
twitterfacebookfacebook
share

(9 / 22)

दीपक पुनियाने ८६ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. त्याने अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद इनामला ३-० ने पराभूत केलं.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावलेल्या रवि कुमार दहियाने पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात कुस्तीत सुवर्णपदक जिंकलं. त्याने नायजेरियाच्या एबिकेवेनिमो वेल्सनला १०-० ने हरवलं
twitterfacebookfacebook
share

(10 / 22)

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावलेल्या रवि कुमार दहियाने पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात कुस्तीत सुवर्णपदक जिंकलं. त्याने नायजेरियाच्या एबिकेवेनिमो वेल्सनला १०-० ने हरवलं

कुस्तीत महिलांच्या ५३ किलो वजनी गटात विनेश फोगाट हिने सुवर्णपदकावर नाव कोरलं. तिने काही सेकंदातच श्रीलंकेच्या चामोडिया केशानी हिला पराभूत केलं.
twitterfacebookfacebook
share

(11 / 22)

कुस्तीत महिलांच्या ५३ किलो वजनी गटात विनेश फोगाट हिने सुवर्णपदकावर नाव कोरलं. तिने काही सेकंदातच श्रीलंकेच्या चामोडिया केशानी हिला पराभूत केलं.

भारताचा कुस्तीपटू नवीन कुमार यानेही सुवर्णपदक जिंकलं. नवीन कुमारने ७४ किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मोहम्मद शरीफ ताहिरला हरवलं.
twitterfacebookfacebook
share

(12 / 22)

भारताचा कुस्तीपटू नवीन कुमार यानेही सुवर्णपदक जिंकलं. नवीन कुमारने ७४ किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मोहम्मद शरीफ ताहिरला हरवलं.(ANI)

पॅरा टेबल टेनिसमध्ये महिला सिंगल क्लास ३-५ कॅटेगरीत भारताच्या भाविना पटेल हिने सुवर्णपदक जिंकलं. तिने नायजेरियाच्या क्रिस्टियानाला १२-१०, ११-२,११-९ असे पराभूत केले.
twitterfacebookfacebook
share

(13 / 22)

पॅरा टेबल टेनिसमध्ये महिला सिंगल क्लास ३-५ कॅटेगरीत भारताच्या भाविना पटेल हिने सुवर्णपदक जिंकलं. तिने नायजेरियाच्या क्रिस्टियानाला १२-१०, ११-२,११-९ असे पराभूत केले.(ANI)

महिलांच्या मिनिमम वेट कॅटेगरीत भारताच्या नीतूने अंतिम लढतीत इंग्लिश बॉक्सर डॅमी जेड रेजटान हिला हरवलं. एकतर्फी झालेल्या या सामन्यात नीतूने ५-० असा विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरलं.
twitterfacebookfacebook
share

(14 / 22)

महिलांच्या मिनिमम वेट कॅटेगरीत भारताच्या नीतूने अंतिम लढतीत इंग्लिश बॉक्सर डॅमी जेड रेजटान हिला हरवलं. एकतर्फी झालेल्या या सामन्यात नीतूने ५-० असा विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरलं.(ANI)

पुरुषांच्या फ्लायवेट कॅटेगरीत अंतिम सामन्यात भारताच्या अमित पांघलने इंग्लंडच्या प्रतिस्पर्ध्याला हरवून सुवर्णपदक पटकावलं. अमितने अंतिम लढत ५-० ने जिंकली.
twitterfacebookfacebook
share

(15 / 22)

पुरुषांच्या फ्लायवेट कॅटेगरीत अंतिम सामन्यात भारताच्या अमित पांघलने इंग्लंडच्या प्रतिस्पर्ध्याला हरवून सुवर्णपदक पटकावलं. अमितने अंतिम लढत ५-० ने जिंकली.(ANI)

पुरुषांच्या ट्रिपल जम्पमध्ये भारताचा अॅथलीट एल्डोस पॉलने १७.०३ मीटर उडी मारत सुवर्णपदक पटकावलं. कॉमनवेल्थच्या इतिहासात ट्रिपल जम्पमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय बनला आहे. त्याच्यासोबत अब्दुल्ला अबूबकर याने रौप्य पदक पटकावले.
twitterfacebookfacebook
share

(16 / 22)

पुरुषांच्या ट्रिपल जम्पमध्ये भारताचा अॅथलीट एल्डोस पॉलने १७.०३ मीटर उडी मारत सुवर्णपदक पटकावलं. कॉमनवेल्थच्या इतिहासात ट्रिपल जम्पमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय बनला आहे. त्याच्यासोबत अब्दुल्ला अबूबकर याने रौप्य पदक पटकावले.(AP)

बॉक्सिंगमध्ये भारताच्या निखत झरीन हिने सुवर्णपदक पटकावलं. तिने नॉर्दन आयर्लंडच्या कार्लीला एकतर्फी झालेल्या लढतीत ५-० ने हरवलं.
twitterfacebookfacebook
share

(17 / 22)

बॉक्सिंगमध्ये भारताच्या निखत झरीन हिने सुवर्णपदक पटकावलं. तिने नॉर्दन आयर्लंडच्या कार्लीला एकतर्फी झालेल्या लढतीत ५-० ने हरवलं.(PTI)

टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी मलेशियाच्या जेवेन चूंग आणि केरेन लीन यांना हरवून सुवर्णपदक जिंकलं. अंतिम लढतीत ११-४, ९-११, ११-५, ११-६ अशा फरकाने विजय मिळवला.
twitterfacebookfacebook
share

(18 / 22)

टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी मलेशियाच्या जेवेन चूंग आणि केरेन लीन यांना हरवून सुवर्णपदक जिंकलं. अंतिम लढतीत ११-४, ९-११, ११-५, ११-६ अशा फरकाने विजय मिळवला.(PTI)

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये पीव्ही सिंधूने महिला एकेरीत सुवर्ण पदक जिंकले. सिंधूने अंतिम फेरीत कॅनडाच्या मिशेल लीचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला.
twitterfacebookfacebook
share

(19 / 22)

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये पीव्ही सिंधूने महिला एकेरीत सुवर्ण पदक जिंकले. सिंधूने अंतिम फेरीत कॅनडाच्या मिशेल लीचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला.(AP)

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये लक्ष्य सेनने सुवर्णपदक जिंकले आहे. लक्ष्यने बॅडमिंटनमधील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत मलेशियाच्या आंग जे योंगचा १९-२१, २१-९, २१-१६ असा पराभव केला.
twitterfacebookfacebook
share

(20 / 22)

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये लक्ष्य सेनने सुवर्णपदक जिंकले आहे. लक्ष्यने बॅडमिंटनमधील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत मलेशियाच्या आंग जे योंगचा १९-२१, २१-९, २१-१६ असा पराभव केला.(ANI)

बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक आणि चिराग शेट्टी यांनी सुवर्णपदक मिळवलं. दोघांनी अंतिम लढतीत इंग्लंडच्या लेन बेन आणि सीन मेंडी यांना सरळ गेममध्ये २१-१५, २१-१३ असे पराभूत केले.
twitterfacebookfacebook
share

(21 / 22)

बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक आणि चिराग शेट्टी यांनी सुवर्णपदक मिळवलं. दोघांनी अंतिम लढतीत इंग्लंडच्या लेन बेन आणि सीन मेंडी यांना सरळ गेममध्ये २१-१५, २१-१३ असे पराभूत केले.(ANI)

भारताच्या शरथ कमलने पुरुष एकेरी टेबल टेनिसमध्ये पहिला गेम गमावल्यानंतर पुनरागमन करत ११-१३, ११-७, ११-२, ११-६, ११-८ असा विजय मिळवला. ३९ व्या रँकवर असलेल्या शरथने २० व्या रँकवर असणाऱ्या पिचफोर्डला हरवून सुवर्णपदक जिंकलं.
twitterfacebookfacebook
share

(22 / 22)

भारताच्या शरथ कमलने पुरुष एकेरी टेबल टेनिसमध्ये पहिला गेम गमावल्यानंतर पुनरागमन करत ११-१३, ११-७, ११-२, ११-६, ११-८ असा विजय मिळवला. ३९ व्या रँकवर असलेल्या शरथने २० व्या रँकवर असणाऱ्या पिचफोर्डला हरवून सुवर्णपदक जिंकलं.(AP)

WhatsApp channel

इतर गॅलरीज