मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  CWG 2022 closing ceremony: बाय-बाय बर्मिंगहॅम! सांगता समारंभात पंजाबी तडका, पाहा फोटो

CWG 2022 closing ceremony: बाय-बाय बर्मिंगहॅम! सांगता समारंभात पंजाबी तडका, पाहा फोटो

Aug 09, 2022 03:04 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्स २०२२ चा भव्य समारोप सोहळा सोमवारी बर्मिंगहॅम येथील अलेक्झांडर स्टेडियममध्ये पार पडला. आता पुढील कॉमनवेल्थ गेम्स हे २०२६ मध्ये ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे होणार आहेत. या समारोपाच्या समारंभात कॉमनवेल्थ खेळांचा ध्वज अधिकृतपणे पुढील यजमानांकडे सोपवण्यात आला. बर्मिंगहॅम येथे आजवरची सर्वात मोठी राष्ट्रकुल स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. या ११ दिवस चाललेल्या खेळांमध्ये ७२ देशांतील ५ हजारांहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला.

समारोप समारंभात टेबल टेनिसपटू शरथ कमल आणि महिला बॉक्सर निखत झरीन हे भारतीय संघाचे ध्वजवाहक होते. उद्घाटन सोहळ्यात ही जबाबदारी बॅडमिंटनपटू पीव्ही सिधू आणि हॉकी टीमचा कर्णधार मनप्रीत सिंग यांच्यावर होती. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 9)

हा कार्यक्रम बर्मिंगहमच्या अलेक्झांडर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला  होता. समरांभात अनेक रंगारंग कार्यक्रम झाले. या सांगता समारंभात बर्मिंगहमच्या इतिहासाचे अनेक पैलू दाखवण्यात आले.
twitterfacebookfacebook
share

(2 / 9)

स्पर्धेच्या सांगता समारंभात भारतीय संस्कृतीचे देखील दर्शन झाले. यावेळी पंजाबी कलाकारांनी कार्यक्रमात प्रचंड रंगत आणली.
twitterfacebookfacebook
share

(3 / 9)

दरम्यान, बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने २२ सुवर्णांसह एकूण ६१ पदके जिंकली. यंदाच्या स्पर्धेत पूर्वीपेक्षा अधिक खेळांचा समावेश करण्यात आला होता. यात महिला टी-20 क्रिकेटचा पहिल्यांदाच या खेळांमध्ये समाविष्ट करण्यात आला होता.
twitterfacebookfacebook
share

(4 / 9)

बर्मिंगहॅम गेम्सच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (८ ऑगस्ट) भारताने चार सुवर्णांसह एकूण ६ पदके जिंकली. इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे पार पडलेली ही २२ वी राष्ट्रकुल स्पर्धा होती. आता पुढील राष्ट्रकुल खेळ चार वर्षांनंतर ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे  होणार आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 9)

यावेळी भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत सर्वाधिक पदके जिंकली. भारतीय कुस्तीपटूंनी १२ पदके जिंकली, ज्यात सहा सुवर्ण, एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 9)

यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी १० पदके आली. तर बॉक्सिंगमध्येही भारताने तीन सुवर्णांसह ७ पदके भारताने जिंकली.
twitterfacebookfacebook
share

(7 / 9)

गेल्या ११ दिवसात ५ हजार पेक्षा जास्त खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेतील विविध खेळात आपला सहभाग नोंदवला होता.
twitterfacebookfacebook
share

(8 / 9)

विषेष म्हणजे, बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सच्या समारोप समारंभात ४० पॉप बँड, अपाचे इंडियन, पंजाबी एमसी आणि डक्सी या सारख्या कलाकारांनी देखील सहभाग नोंदवला होता.
twitterfacebookfacebook
share

(9 / 9)

विषेष म्हणजे, बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सच्या समारोप समारंभात ४० पॉप बँड, अपाचे इंडियन, पंजाबी एमसी आणि डक्सी या सारख्या कलाकारांनी देखील सहभाग नोंदवला होता.

WhatsApp channel

इतर गॅलरीज