मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Cucumber for Weight Loss: उन्हाळ्यात काकडीचा आहार १५ दिवसात कमी करेल ७ किलो वजन! पाळा हे नियम

Cucumber for Weight Loss: उन्हाळ्यात काकडीचा आहार १५ दिवसात कमी करेल ७ किलो वजन! पाळा हे नियम

Apr 03, 2024 05:51 PM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

  • Weight Loss With Cucumber Diet: काकडी व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन के आणि फोलेट सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असते. यात कॅलरी नाममात्र असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे जादूसारखे काम करते. पाहा काकडीचा आहार घेताना कोणते नियम पाळावे

ज्यांना बारीक व्हायचे आहे, वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी काकडीपेक्षा चांगले काहीच असू शकत नाही! आपल्या सर्वांना माहित आहे की काकडीत अनेक पोषक घटक उपलब्ध आहेत आणि त्यात जवळजवळ शून्य कॅलरी असतात. केवळ सलाद म्हणून नाही तर स्नॅक म्हणूनही ते खाल्ले जाऊ शकते. काकडीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती अन्न पचवते. बराच वेळ पोट भरून ठेवते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

अर्धा कप चिरलेल्या काकडीत फक्त ८ कॅलरीज असतात. परंतु १.९ ग्रॅम कार्बोहायड्रेट, ०.३ ग्रॅम फायबर आणि ०.३ ग्रॅम प्रथिने असतात. यात मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि मॅंगनीज देखील असते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

चला तर मग पाहूया काकडीचा डाएट प्लॅन. हे जितके मोहक आणि सोपे वाटते तितकेच काकडी प्रत्यक्षात नैसर्गिकरित्या वजन कमी करणारी भाजी आहे. याच्या मदतीने तुम्ही १५ दिवसांत ७ किलो वजन कमी करू शकता. पण अशावेळी शरीराला प्रथिने देण्यासाठी चीज, चिकन, मासे, मांस, टोफू, डाळी असे पदार्थ घ्यावे लागतात. दिवसातून ३ जेवणात प्रथिने ठेवा. जास्तीत जास्त १५०-२०० ग्रॅम. उरलेल्या वेळेस भूक लागली तर काकडी खावी लागेल.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

परिणामी आपल्या शरीराला इतर फळे किंवा भाज्यांमधून मिळणाऱ्या कॅलरीजचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे वजन कमी होईल. आणि काकडीतील उच्च फायबर तुमचे पोट भरून ठेवेल. पण लक्षात ठेवा ब्लड प्रेशर, शुगर किंवा गरोदरपणात किंवा स्तनपान यासारखे आजार असल्यास हा आहार पाळू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने सलग १५ दिवस हे करता येते.  
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

उन्हाळ्यात काकडीचा रस आहारात ठेवा. हा रस शरीराला डिटॉक्स करण्याचे ही काम करतो. आणि जर खराब विषारी द्रव्य विष शरीरातून बाहेर पडले तर ते आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये मदत करेल. काकडीच्या बिया शरीरात जमा झालेले अतिरिक्त पाणी काढून टाकतात. काकडीत इथेनॉल नावाचे घटक असते, जे शरीरातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते आणि पोटातील चरबी आणि साखर आणि कोलेस्ट्रॉलच्या पातळीमध्ये थेट संबंध आहे. त्यामुळे हे ७ दिवस नियमितपणे एक ग्लास काकडीचा रस प्यावा. पण लक्षात ठेवा, ताण देऊ नका. नट्स आणि सीड्ससोबत प्या. चव वाढवण्यासाठी थोडे मीठ आणि चाट मसाला घालू शकता.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज