रचिन रविंद्र ते समीर रिझवी… सीएसकेचे हे युवा खेळाडू गाजवणार यंदाचं आयपीएल, पाहा
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  रचिन रविंद्र ते समीर रिझवी… सीएसकेचे हे युवा खेळाडू गाजवणार यंदाचं आयपीएल, पाहा

रचिन रविंद्र ते समीर रिझवी… सीएसकेचे हे युवा खेळाडू गाजवणार यंदाचं आयपीएल, पाहा

रचिन रविंद्र ते समीर रिझवी… सीएसकेचे हे युवा खेळाडू गाजवणार यंदाचं आयपीएल, पाहा

Mar 14, 2024 01:37 PM IST
  • twitter
  • twitter
  • CSK In IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२४ साठी अनेक युवा खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले आहे. हे खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीच्या जोारावर खळबळ माजवू शकतात.
आयपीएल २०२४ साठीच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने अनेक युवा खेळाडूंवर बोली लावली. सीएसकेने रचिन रविंद्र, समीर रिझवी यांसारख्या युवा खेळाडूंवर कोट्यवधी रुपये खर्च केले. आता हे खेळाडू त्यांच्या पहिल्या-वहिल्या आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतात हे पाहणे रंजक ठरणार आहे. 
twitterfacebook
share
(1 / 5)

समीर रिझवी- समीर रिझवी हा आयपीएल २०२४ च्या लिलावातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्याला ८.४ कोटी रुपयांना विकत घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२३-२०२४ मध्ये यूपीसाठी त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. यातूनच त्याला खरी ओळख मिळाली. तो या स्पर्धेत यूपीसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. 
twitterfacebook
share
(2 / 5)

समीरने स्पर्धेत ७ सामने खेळले आणि ६९.२५ च्या सरासरीने २७७ धावा केल्या. याशिवाय, त्याने यूपी टी-20 लीगमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. त्याने १० सामन्यांमध्ये ४५५ धावा केल्या. आता सीएसकेलाही त्याच्याकडून तशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
twitterfacebook
share
(3 / 5)

रचिन रविंद्र- न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रने वनडे वर्ल्डकप २०२३ मध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्याने विश्वचषकात १० सामने खेळले आणि ५७८ धावा केल्या, ज्यात ३ शतकी खेळींचा समावेश होता. यानंतर CSK ने IPL 2024 साठी २४ वर्षीय रचिनला १.८ कोटी रुपयांना विकत घेतले. 
twitterfacebook
share
(4 / 5)

रवींद्रने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत ६ सामने खेळले असून ४३३ धावा केल्या आहेत. सोबतच त्याने १० बळीही घेतले आहेत. रचिन रविंद्रने न्यूझीलंडसाठी २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८२० धावा केल्या आहेत आणि १८ विकेट्स घेतल्या आहेत. रचिन रवींद्रची ही अष्टपैलू कामगिरी त्याला आयपीएल २०२४ मध्ये CSK चा स्टार खेळाडू बनवू शकते.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज