
शेवटच्या ६ चेंडूत पंजाबला ९ धावांची गरज होती. सिकंदर रझा आणि शाहरुख खान क्रीजवर होते. शेवटच्या चेंडूवर सिकंदर रजाने धावून ३ रन्स घेत थरारक विजय मिळवला.
(PTI)सामन्यात पंजाबचा संघ २०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रभसिमरन सिंगने या सामन्यात २४ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. तर लियाम लिव्हिंगस्टोनने २४ चेंडूत ४० धावा केल्या.
(PTI)चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर संघाने ४ बाद २०० धावा केल्या. स्टार सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने ५२ चेंडूत ९२ धावांची धडाकेबाज खेळी केली. यादरम्यान त्याने १ षटकार आणि १६ चौकार मारले.

