नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे या सलामीच्या जोडीने चेन्नईला संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी ११० धावांची शानदार भागीदारी केली.
(AFP)ऋतुराजच्या बॅटमधून शानदार अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली, ज्यामध्ये त्याने ३१ चेंडूत ५७ धावांची शानदार खेळी केली, याशिवाय कानवेने २९ चेंडूत ४७ धावांची खेळीही पाहायला मिळाली.
२१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सच्या केएल राहुल आणि काइल मेयर्सच्या जोडीने पहिल्याच षटकापासून वेगाने धावा काढण्याची प्रक्रिया सुरू केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ६ षटकांत ७९ धावांची भागीदारी केली.
(AFP)लखनौकडून काइल मेयर्सने सर्वाधिक ५३ धावा केल्या. त्याचवेळी निकोलस पूरनने ३२ आणि आयुष बडोनीने २३ धावा केल्या. सीएसकेकडून मोईन अलीने ४ खेळाडूंना बाद केले.
चेन्नईच्या डावातील शेवटच्या षटकात धोनीने २ शानदार षटकार ठोकले, ज्यामुळे चेन्नई संघ २० षटकात ७ विकेट गमावून २१७ धावांपर्यंत मजल मारू शकला.
(AP)