गुजरात टायटन्सचा संघ क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करून अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर चेन्नईने क्वालिफायर-1 मध्ये हार्दिक पंड्याच्या गुजरातला पराभूत करून आयपीएल फायनल गाठली.
आयपीएल फायनलमध्ये चेन्नई आणि गुजरात दोन्ही संघाचे काही खेळाडू गेमचेंजर ठरू शकतात. अशा खेळाडूंबाबत आपण जाणून घेणार आहोत.
गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल फायनलमध्ये एक्स फॅक्टर ठरू शकतो. शुभमनने IPL 2023 मध्ये ३ शतकांसह सर्वाधिक ८५१ धावा केल्या आहेत.
गुजरात टायटन्सचा फिरकीपटू राशिद खानने गोलंदाजीशिवाय फलंदाजीतही ताकद दाखवली आहे. राशिदने १६ सामन्यात २७ विकेट घेतल्या आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो मोहम्मद शमीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ड्वेन कॉनवेसाठीही IPL 2023 अप्रतिम राहिले आहे. या मोसमात ड्वेन कॉनवेने आतापर्यंत १५ सामन्यात ६२५ धावा केल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज मथिषा पाथिरानाने उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर केला आहे. डेथ ओव्हर्समध्ये तो धोकादायक ठरतो. पाथिरानाने ११ सामन्यात १७ विकेट घेतल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्जच्या ऋतुराज गायकवाडसाठीही आयपीएल 2023 चा मोसम खूप छान ठरला आहे. ऋतुराजने १५ सामन्यात ५६४ धावा केल्या आहेत. ऋतुराज या मोसमात सर्वाधिक धावा करणारा सातवा खेळाडू आहे.