
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने ३ गडी गमावून २२३ धावा केल्या. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी झंझावाती पद्धतीने फिफ्टी ठोकली. दोघांनी ८७ चेंडूत १४१ धावांची सलामी भागीदारी केली.
(AFP)गायकवाडने ५० चेंडूत ७९ धावांची खेळी केली. तर कॉनवेने ५२ चेंडूत ८७ धावा केल्या. गायकवाडने ७ षटकार तर कॉनवेने ३ षटकार मारले. अखेरीस शिवम दुबेने ९ चेंडूत २२ धावा केल्या, तर रवींद्र जडेजाने ७ चेंडूत २० धावा केल्या.
२२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ ९ विकेटवर १४६ धावाच करू शकला आणि सामना गमावला.
(AFP)दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ५८ चेंडूत ८६ धावांची धडाकेबाज खेळी केली, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याने आपल्या खेळीत ५ षटकार आणि ७ चौकार लगावले.
(AFP)

