अयोध्येत आज श्री रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाला आहे. यासोबतच राम भक्तांचीअनेक वर्षांपासूनची प्रतीक्षाही संपली आहे. रामललाला गर्भगृहात विराजमान करण्यात आले असून त्यांचे पहिला फोटोही समोर आला आहे.
(PTI)या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गर्भगृहात रामललाची पूजा केली आणि त्यानंतर मूर्तीपूजेचा विधी पूर्ण झाला.
श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही अयोध्येत पोहोचला आहे. त्याने या ऐतिहासिक सोहळ्याला हजेरी लावली.
(ANI)माजी दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे अयोध्येत पोहोचला आहे. अनिल कुंबळेची पत्नीही त्याच्यासोबत आहे. त्याने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
(Anil Kumble IG)भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजही अयोध्येत पोहोचली आहे. मिताली राजचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
(Saina Nehwal IG)भारताची दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालही राम मंदिर प्राण प्रतिष्ठामध्ये सहभागी होण्यासाठी अयोध्येत आली आहे. ती तिच्या आईसोबत या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी झाली.
(SAINA NEHWAL IG)भारताचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद हेदेखील रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहिले.
(Venkatesh Prasad X)टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाही अयोध्येत पोहोचला आहे. तो आणि त्याची पत्नी आमदार रिवाबा हे या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी झाले.