Year Ender 2024 : यंदा म्हणजेच २०२४ या वर्षात बऱ्याच क्रिकेटपटूंच्या घराघरात पाळणा हलला. या यादीत विराट कोहली रोहित शर्मा यांच्यासह केन विल्यमसन आणि ट्रॅव्हिस हेड यांसारख्या क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. याशिवाय पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदीही बाप झाला आहे.
(1 / 6)
२०२४ वर्ष विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना क्रिकेटच्या मैदानावर चांगले गेले नाही. पण या दोघांच्या घरी यंदा नव्या पाहुण्यांचे आगमन झाले. रोहित आणि विराट या दोघांनाही या वर्षी मुलगा झाला. रोहितच्या मुलाचे नाव अहान ठेवण्यात आले. तर विराटने त्याच्या मुलाचे नाव अकाय ठेवले आहे.
(2 / 6)
विराट कोहली : या वर्षात अनेक क्रिकेटपटू बाप बनले. यावर्षी वडील बनलेल्या क्रिकेटपटूंची यादी विराट कोहलीपासून सुरू होते. विराट फेब्रुवारीमध्ये एका मुलाचा पिता झाला. विराट अनुष्काने या मुलाचे नाव अकाय ठेवले आहे.
(3 / 6)
रोहित शर्मा : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माही याच वर्षी वडील झाला आहे. भारतीय कर्णधार देखील एका मुलाचा पिता बनला, ज्याचे नाव अहान ठेवण्यात आहे. रोहित आणि रितिका यांना आधीच एक समायरा नावाची मुलगीही आहे.
(4 / 6)
शाहीन आफ्रिदी: पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने २०२२ मध्ये शाहिद आफ्रिदी याची मुलगी अंशा आफ्रिदीशी लग्न केले. शाहीन ऑगस्ट २०२४ मध्ये एका मुलाचा पिता झाला.
(5 / 6)
केन विल्यमसन : न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसनच्या घरीही यंदा पाळण हलला. विल्यमसन तिसऱ्यांदा वडील झाला. विल्यमसनच्या घरात एका मुलीचा जन्म झाला.
(6 / 6)
सरफराज खान : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सरफराज खानही यावर्षी पिता बनला. सरफराजची पत्नी रोमाना जहूर हिने एका मुलाला जन्म दिला.
(7 / 6)
ट्रॅव्हिस हेड : क्रिकेटच्या मैदानावर भारतातचा सर्वात मोठा शत्रू म्हणून ओळखला जाणारा ट्रॅव्हिस हेड दुसऱ्यांदा पिता बनला. हेडने आपल्या बाळाच्या जन्माची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती.