ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजाने २०२३ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा केल्या आहेत. त्याने २४ डावात १ हजार २१० धावा केल्या आहेत. २०२३ मध्ये कसोटीत १००० पेक्षा जास्त धावा करणारा ख्वाजा हा एकमेव क्रिकेटर आहे. त्याने ३ शतके आणि ६ अर्धशतके झळकावली आहेत.
(AFP)यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २४ डावात ९२९ धावा केल्या आहेत, ज्यात ३ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
(AFP)या यादीत ट्रॅव्हिस हेड तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. २०१३ मध्ये त्याने २३ डावात ९१९ धावा केल्या आहेत. हेडने यावर्षी एक शतक आणि ५ अर्धशथक ठोकली आहेत.
(AFP)ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने २५ डावात ८०३ धावा केल्या आहेत. लाबुशेनने २०२३ मध्ये एक कसोटी शतक झळकावले. इतर ४ अर्धशतकांचा स्फोट झाला आहे.
(AP)या यादीत इंग्लंडचा जो रूट पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने २०२३ मध्ये १४ कसोटी डावांमध्ये दोन शतक आणि ५ अर्धशतकांसह ७८७ धावा केल्या आहेत.
(Reuters)इंग्लंडचा हॅरी ब्रूक या यादीत सहाव्या स्थानावर आहे. त्याने २०२३ मध्ये १४ कसोटी डावांमध्ये ७०१ धावा केल्या होत्या, ज्यात एक शतक आणि ६ अर्धशतकं झळकावली.
(Reuters)या यादीत न्यूझीलंडचा केन विल्यमसन सातव्या क्रमांकावर आहे. त्याने यावर्षी १३ कसोटी डावात ६९५ धावा केल्या आहेत. किवीज स्टारने ४ शतके झळकावली..
(AP)