Yusuf Pathan Lok sabha Election 2024 : भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण लोकसभा निवडणुकीत विजयी झाला आहे. युसूफने तृणमूल कॉंग्रेसकडून निवडणूक लढवताना काँग्रेसचे दिग्गज नेते अधीर रंजन चौधरी यांचा बहरामपूर मतदारसंघातून पराभव केला.
(1 / 7)
युसूफ पठाणआधी टीम इंडियाचे अनेक क्रिकेटपटू लोकसभेचे खासदार राहिले आहेत. यामध्ये गौतम गंभीर, किर्ती आझाद, नवज्योत सिद्धू, मोहम्मद अझहरूद्दीन यांचा समावेश आहे.
(2 / 7)
भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण लोकसभा निवडणुकीत विजयी झाला आहे. युसूफने तृणमूल कॉंग्रेसकडून निवडणूक लढवताना काँग्रेसचे दिग्गज नेते अधीर रंजन चौधरी यांचा बहरामपूर मतदारसंघातून पराभव केला.
(3 / 7)
गौतम गंभीरने २०१९ मध्ये भाजपकडून निवडणूक लढवली आणि जिंकली. पण आता त्याने राजकारणातून निवृत्ती घेतली आहे.
(4 / 7)
या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू २००४ ते २०१४ पर्यंत खासदार होते. सिद्धू यांनी अमृतसर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
(5 / 7)
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार झाला. अझरुद्दीनने काँग्रेसच्या तिकिटावर यश मिळवले होते. मात्र, आता मोहम्मद अझरुद्दीन सक्रिय राजकारणाचा भाग नाही.
(6 / 7)
१९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. कीर्ती आझाद देखील त्या भारतीय संघाचे भाग होते. क्रिकेटला अलविदा केल्यानंतर कीर्ती आझाद यांनी राजकीय क्षेत्रात नशीब आजमावले. कीर्ती आझाद यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारच्या दरभंगा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला.
(7 / 7)
माजी भारतीय क्रिकेटपटू चेतन चौहान हे भारतीय जनता पक्षाशी दीर्घकाळ संबंधित होते. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर ते पहिल्यांदा खासदार झाले. याशिवाय ते उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते.