Crazy Fans Gifts: कुणी पाठवले न्यूड व्हिडीओ, तर कुणी हजारो प्रेमपत्र! कलाकारांच्या चाहत्यांच्या वेडेपणाने केली हद्द पार!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Crazy Fans Gifts: कुणी पाठवले न्यूड व्हिडीओ, तर कुणी हजारो प्रेमपत्र! कलाकारांच्या चाहत्यांच्या वेडेपणाने केली हद्द पार!

Crazy Fans Gifts: कुणी पाठवले न्यूड व्हिडीओ, तर कुणी हजारो प्रेमपत्र! कलाकारांच्या चाहत्यांच्या वेडेपणाने केली हद्द पार!

Crazy Fans Gifts: कुणी पाठवले न्यूड व्हिडीओ, तर कुणी हजारो प्रेमपत्र! कलाकारांच्या चाहत्यांच्या वेडेपणाने केली हद्द पार!

Jun 17, 2024 11:26 AM IST
  • twitter
  • twitter
Crazy Fans Gifts: बॉलिवूड कलाकारांचे चाहते कधी कधी अशा वेडेपणाच्या गोष्टी करतात की, त्या ऐकल्यानंतर कुणालाही आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही क्रेझी फॅन्सबद्दलचे किस्से...
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या चाहत्याने तिला भेटू न शकल्याने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याबद्दल सांगितले होते. अनेक वेळा बॉलिवूड स्टार्सचे चाहते अशीच वेडेपणाची हद्द पार करतात.
twitterfacebook
share
(1 / 7)

वाणी कपूरचा एक दिवाना झालेला चाहता एकदा तिच्या मागे गेला. या चाहत्याने बाईकवरून अभिनेत्रीच्या कारचा अनेक किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. गाडीचा वेग वाढवूनही तो अभिनेत्रीच्या मागे लागला होता. समीर खान नावाच्या या मुलाला अभिनेत्रीशी बोलायचे होते. या घटनेने वाणी इतकी घाबरली की, तिने नंतर वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
twitterfacebook
share
(2 / 7)

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत एक धक्कादायक घटना घडली, जेव्हा त्याचा एक चाहता त्याला भेटण्याच्या प्रयत्नात रात्री १.३० वाजता त्याच्या बंगल्यात घुसला. हरियाणातील हा मुलगा अवघ्या 22 वर्षांचा होता आणि नंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
twitterfacebook
share
(3 / 7)

रणवीर सिंहने एकदा सांगितले की, जेव्हा तो चेंजिंग रूममध्ये कपडे बदलत होता, तेव्हा त्याला काहीतरी विचित्र दिसले. एक मुलगा तिथे उभा होता, जेव्हा तो पूर्णपणे नग्न होता तेव्हा त्याचा व्हिडीओ बनवत होता. या मुलाने आपल्या मोबाईलचा फ्लॅश लाईटही चालू केला होता. गुपचूप आत घुसलेल्या या मुलाला रणवीर गंमतीने म्हणाला, ‘तू टॉर्च बंद ठेवला असतास, तर पकडला गेला नसतास.’
twitterfacebook
share
(4 / 7)

सलमान खानचे जगभरात वेडे चाहते आहेत. त्यांच्या एका महिला चाहतीने एकदा त्याच्या वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. झालं असं की, तिच्या चुकीमुळे फायर अलार्म वाजला आणि पोलिसांऐवजी कुटुंबीयांनी फायर ब्रिगेडला बोलावलं. नंतर, जेव्हा ही मुलगी पकडली गेली, तेव्हा ती सतत सलमान खानला तिचा नवरा म्हणत होती.
twitterfacebook
share
(5 / 7)

वाणी कपूरप्रमाणेच हृतिक रोशनलाही त्याच्या चाहत्यांपासून मोकळीक मिळणे कठीण झाले होते. तो जबलपूरमध्ये ‘मोहन-जो-दारो’चे शूटिंग करत असताना काही दुचाकीस्वारांनी त्याच्या कारचा पाठलाग केला. अभिनेत्याने नंतर सगळ्यांनाच आवाहन केले की, त्याच्या चाहत्यांनी असे करू नये.
twitterfacebook
share
(6 / 7)

अशीच एक घटना कंगना रनौतसोबतही घडली आहे. एका चाहत्याने अभिनेत्रीला हजारो प्रेमपत्रे पाठवायला सुरुवात केली होती आणि हा चाहता दावा करत होता की कंगना रनौत त्याची मैत्रीण आहे.
twitterfacebook
share
(7 / 7)

सलमान खानच्या एका चाहत्याने त्याला भेटण्याच्या प्रयत्नात उपोषण केले होते. सलमान खान 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटासाठी शूटिंग करत असताना त्याच्या एका चाहत्याने अभिनेत्याला भेटण्याचा आणि त्याच्यासोबत एक फोटो क्लिक करण्याचा आग्रह धरला. मात्र, भाईजान न भेटल्याने या चाहत्याने उपोषण केले होते.
twitterfacebook
share
(8 / 7)

इतर गॅलरीज