मराठी बातम्या  /  Photo Gallery  /  Countrys Largest Agricultural Exhibition Krishik 2023 Begins In Baramati

देशातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनास 'कृषिक-२०२३' ला बारामतीत सुरुवात, राज्यातील शेतकऱ्यांची गर्दी

Jan 23, 2023 07:30 PM IST Shrikant Ashok Londhe
Jan 23, 2023 07:30 PM , IST

Krishik 2023  : ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, KVK, कृषि महाविद्यालय, अटल इन्क्युबेशन सेंटर, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ लंडन यांच्यावतीने बारामतीत देशातील सर्वांत मोठे ‘कृषिक २०२३’ हे कृषी प्रदर्शन सुरु असून अनेक कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेऊन आपले तंत्रज्ञान शेतकऱ्यांसमोर मांडले आहे.

कृषिक हे भारतातील सर्वात मोठे प्रात्यक्षिके व कृषी प्रदर्शन बारामती येथे दरवर्षी भरवण्यात येते. अतिशय भव्य स्वरुपात हे प्रदर्शन यावर्षी भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात प्रामुख्याने नवीन तंत्रज्ञान पाहण्यास मिळाले. आज शरद पवार व रोहित पवार यांनी या प्रदर्शनास भेट दिली.

(1 / 5)

पुण्यातील VIIT इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली रेसिंग कार कृषिक-२०२३ प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. ही गाडी बनवणाऱ्या टीममध्ये मॅनेजर म्हणून कर्जत जामखेड मतदारसंघातील जामखेडचा राहुल खाडे हा विद्यार्थी आहे. त्याच्याकडून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गाडीची माहिती घेतली.

(2 / 5)

कृषिक प्रदर्शनास राज्यभरातून शेतकरी, कृषी क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, विद्यार्थी, सामान्य नागरिक यांची गर्दी होत आहे. यामध्ये प्रामुख्याने युवकांचा सहभाग लक्षणीय दिसून येत आहे.

(3 / 5)

या प्रदर्शनात शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उगवलेली पीक प्रात्यक्षिके, हायड्रोपोनिक्स, ड्रोन द्वारे फवारणी, विविध भाज्यांचे नवनवीन वान,शेतीमध्ये वापरात येणाऱ्या नवनवीन मशिनरी इत्यादींबाबत माहिती देण्यात येत आहे.

(4 / 5)

कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे आयोजित कृषी प्रात्यक्षिकांवर आधारित देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन 'कृषिक-२०२३' हे सर्व पाच दिवसात घडवून आणण्यासाठी त्याची मॅनेजमेंट प्रॅक्टिक्स असेल, लागवड असेल, पेरणी असेल किंवा जे जे ॲग्रिकल्चर प्रॅक्टिक्सेस असतील ते फार काळजीपूर्वक कराव्या लागतात. जेणेकरुन या पाच दिवसातच शेतकऱ्यांना लाईव्ह क्रॉप डेमोसेशन पाहण्यास मिळते.

(5 / 5)

WhatsApp channel

इतर गॅलरीज