मराठी बातम्या / फोटोगॅलरी / /
Odisha train accident : ओडिशा तिहेरी ट्रेन अपघात; पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी देणार भेट, जखमींची करणार चौकशी
Odisha train accident : शुक्रवारी संध्याकाळी उशिरा कोरोमंडल एक्सप्रेस आणि बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस यांच्यात भीषण टक्कर झाली. या अपघातात आतापर्यंत २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताची दखल घेतली आहे. ते आज अपघातस्थळी जाऊन पाहणी करणार आहेत.
(1 / 12)
शुक्रवारी संध्याकाळी उशिरा कोरोमंडल एक्सप्रेस आणि बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस यांच्यात भीषण टक्कर झाली. यात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला. ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहे. कोरोमंडल एक्सप्रेस पश्चिम बंगालमधील शालीमार स्टेशन आणि चेन्नई दरम्यान धावते. यशवंतपूरहून येणाऱ्या दुसऱ्या पॅसेंजर ट्रेनला त्याची धडक बसली. त्याचे अनेक डबे रुळावरून घसरले. यानंतर समोरून येणाऱ्या मालगाडीलाही धडक दिली.(ANI)
(2 / 12)
ओडिशातील बालासोर येथे भीषण रेल्वे अपघात झाला. दोन जून रोजी संध्याकाळी ही घटना घडली. (File Photo)
(3 / 12)
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना २ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तेही आज सकाळी घटनास्थळी पोहोचले. (REUTERS)
(4 / 12)
चेन्नई-जाणाऱ्या कोरोमंडल एक्स्प्रेसचे सुमारे 10-12 डबे रुळावरून घसरले जेव्हा ती मालगाडीला धडकली आणि बालासोरजवळ जवळच्या ट्रॅकवर पडली. यशवंतपूरहून हावडाकडे जाणारी दुसरी ट्रेन कोरोमंडल एक्स्प्रेसच्या रुळावरून घसरलेल्या डब्यांना धडकली. ही घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली.(ANI)
(5 / 12)
बालासोर, ओडिशात, रेल्वे अपघातानंतर अनेक नागरिक गंभीर जखमी झाले. नागरिक जिवाच्या आकांताने ओरडत होते. तसेच डब्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते. (REUTERS)
(6 / 12)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या अपघातांबद्दल दुख: व्यक्त केले. अपघातात जखमी झालेले नागरिक लवकर बरे होवो, असे ट्विट त्यांनी केले. मी रेल्वेमंत्र्यांशी बोललो आहे आणि "सर्व शक्य मदत" दिली जात आहे असे देखील ते म्हणाले. (REUTERS)
(7 / 12)
घटनास्थळी लष्कर देखील आले असून त्यांनी देखील बचाव कार्य सुरू केले आहे. याबाबत कर्नल एसके दत्ता म्हणाले की काल रात्रीपासून बचाव कार्य सुरू आहे आणि कोलकाताहून अधिक सैन्य कर्मचारी बचावकार्यासाठी येणार आहेत. (REUTERS)
(8 / 12)
ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या मोठ्या अपघातानंतर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत.(REUTERS)
(9 / 12)
उध्वस्त झालेल्या गाड्यांवर चढून वाचलेल्याना मदत करण्यात येत होती. रात्री या परिसरात अंधार असल्याने टॉर्चचा वापर करून डब्यांचे दरवाजे आणि खिडक्या तोडण्यात आले. (REUTERS)
(10 / 12)
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी ओडिशातील दुःखद रेल्वे अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले. या घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांप्रती त्यांनी शोक व्यक्त केला. "ओडिशातील रेल्वे दुर्घटनेमुळे खूप दुःख झाले. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या शोकसंतप्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. असून या कठीण काळात केरळ ओडिशाच्या पाठीशी उभे आहे, असे त्यांनी ट्विट केले आहे. (REUTERS)
(11 / 12)
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताची दुर्दैवी बातमी ऐकून खूप दु:ख झाले... या अपघातात शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले... शोकाकुल कुटुंबांप्रती माझी तीव्र संवेदना... अपघातात जखमी झालेल्यांना लवकरात लवकर लवकर मिळो, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. लवकरच ठीक आहे,” पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. (ANI)
इतर गॅलरीज