मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  odisha train accident : ओडिशात दोन नव्हे तर तीन रेल्वे गाड्या धडकल्या; २३३ प्रवाशी ठार, बचावकार्य सुरू, पाहा फोटो

odisha train accident : ओडिशात दोन नव्हे तर तीन रेल्वे गाड्या धडकल्या; २३३ प्रवाशी ठार, बचावकार्य सुरू, पाहा फोटो

Jun 03, 2023 09:06 AM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

Coromandel Express Accident : शुक्रवारी ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातात २३३ प्रवाशी ठार तर ९०० प्रवाशी जखमी झालेत. या अपघातात तीन रेल्वे गाड्या एकमेकांना धडकल्याची माहिती आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहेत.  

बालासोरमधील बहनगा स्टेशनजवळ मालगाडीला धडक दिल्यानंतर कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली. या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी प्रवाशांना वाचवण्यासाठी घटनास्थळी जमले. (ANI) 
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

बालासोरमधील बहनगा स्टेशनजवळ मालगाडीला धडक दिल्यानंतर कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली. या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी प्रवाशांना वाचवण्यासाठी घटनास्थळी जमले. (ANI) 

या भीषण अपघातात तीन रेल्वेगाड्या एकमेकांना धडकल्या असून या भीषण अपघातात तब्बल २३३ पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० प्रवाशी जखमी झाले आहेत. सकाळ होऊनही  बचावकार्यअद्याप थांबलेले नाही.  
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

या भीषण अपघातात तीन रेल्वेगाड्या एकमेकांना धडकल्या असून या भीषण अपघातात तब्बल २३३ पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० प्रवाशी जखमी झाले आहेत. सकाळ होऊनही  बचावकार्यअद्याप थांबलेले नाही.  (HT_PRINT)

मालगाडीच्या समोरासमोर झालेल्या धडकेनंतर कोरोमंडल एक्सप्रेसचे चार डबे रुळावरून घसरल्यानंतर बचावकार्य सुरू आहे. या अपघातात आणखी एक बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचाही समावेश आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

मालगाडीच्या समोरासमोर झालेल्या धडकेनंतर कोरोमंडल एक्सप्रेसचे चार डबे रुळावरून घसरल्यानंतर बचावकार्य सुरू आहे. या अपघातात आणखी एक बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचाही समावेश आहे.(PTI)

कोमल एक्स्प्रेस कोलकाताजवळील शालीमार स्थानकावरून चेन्नई सेंट्रलला जात असताना संध्याकाळी ७.२० च्या सुमारास बहनमा स्थानकावर हा अपघात झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दक्षिण पूर्व रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अपघाती मदत गाड्या अपघातस्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. अपघातानंतर तातडीने बचाव मोहीम राबवून ३०० प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

कोमल एक्स्प्रेस कोलकाताजवळील शालीमार स्थानकावरून चेन्नई सेंट्रलला जात असताना संध्याकाळी ७.२० च्या सुमारास बहनमा स्थानकावर हा अपघात झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दक्षिण पूर्व रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अपघाती मदत गाड्या अपघातस्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. अपघातानंतर तातडीने बचाव मोहीम राबवून ३०० प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.(via REUTERS)

ओडिशा ट्रेन दुर्घटनेनंतर शुक्रवारी उशिरा हावरा येथील रेल्वे स्थानकावर थांबलेले प्रवासी. या अपघातामुळे किमान १८ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर अनेक गाड्या इतर मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

ओडिशा ट्रेन दुर्घटनेनंतर शुक्रवारी उशिरा हावरा येथील रेल्वे स्थानकावर थांबलेले प्रवासी. या अपघातामुळे किमान १८ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर अनेक गाड्या इतर मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत.(PTI)

बालासोरमध्ये झालेल्या ओडिशाच्या ट्रेन दुर्घटनेनंतर लोकांना मदत करण्यासाठी कोलकाता येथील हावडा स्टेशनवरील हेल्प डेस्कवर बसलेले अधिकारी. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

बालासोरमध्ये झालेल्या ओडिशाच्या ट्रेन दुर्घटनेनंतर लोकांना मदत करण्यासाठी कोलकाता येथील हावडा स्टेशनवरील हेल्प डेस्कवर बसलेले अधिकारी. (HT Photo/ Samir Jana)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज