(3 / 8)रक्तातील यूरिक ॲसिडच्या पातळीत वाढ होण्याच्या स्थितीला हायपर्युरिसेमिया म्हणतात. युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यानंतर हात आणि पायांमध्ये तीव्र वेदना होण्याची तक्रार सुरू होते. त्यामुळे लोकांना चालायला आणि बसायलाही त्रास होऊ लागतो. त्याच वेळी, यूरिक ॲसिडमुळे संधिवात, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या रोगांची लक्षणे देखील वाढू शकतात. यूरिक ॲसिड वाढण्यापासून रोखण्यासाठी, तुम्हाला काही पांढरे पदार्थ खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घ्या हे कोणते पदार्थ आहेत.