PHOTOS : लग्नानंतर नवदांम्पत्यांना गिफ्ट म्हणून देणार कंडोम; या राज्याचा मोठा निर्णय!-condoms to be given as gifts to newlyweds after marriage big decision of odisha government see details with photos ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : लग्नानंतर नवदांम्पत्यांना गिफ्ट म्हणून देणार कंडोम; या राज्याचा मोठा निर्णय!

PHOTOS : लग्नानंतर नवदांम्पत्यांना गिफ्ट म्हणून देणार कंडोम; या राज्याचा मोठा निर्णय!

PHOTOS : लग्नानंतर नवदांम्पत्यांना गिफ्ट म्हणून देणार कंडोम; या राज्याचा मोठा निर्णय!

Aug 14, 2022 11:07 PM IST
  • twitter
  • twitter

Population Control : भारतात लोकसंख्या नियंत्रण करण्याचा विचार फार पूर्वीपासून केला जात आहे. मात्र, एवढ्या मोठ्या देशात लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी करणं सोपी गोष्ट नाही. अशातच आता ओडिशा राज्य सरकारने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

Gift For New Marriage Couple By Odisha Government : देशात आता नवविवाहित जोडप्यांना भेटवस्तू म्हणून कंडोम देण्याचा निर्णय उडीसा सरकारनं घेतला आहे. गिफ्ट किटमध्ये गर्भनिरोधक गोळ्या, कंडोम असतील. कौटुंबिक नियोजन पद्धती आणि सुरक्षित लैंगिक संबंधांवर एक पुस्तकही दिले जाईल. या पुस्तकात कंडोमच्या फायद्यांबद्दलही सांगितलं जाणार आहे.
share
(1 / 4)
Gift For New Marriage Couple By Odisha Government : देशात आता नवविवाहित जोडप्यांना भेटवस्तू म्हणून कंडोम देण्याचा निर्णय उडीसा सरकारनं घेतला आहे. गिफ्ट किटमध्ये गर्भनिरोधक गोळ्या, कंडोम असतील. कौटुंबिक नियोजन पद्धती आणि सुरक्षित लैंगिक संबंधांवर एक पुस्तकही दिले जाईल. या पुस्तकात कंडोमच्या फायद्यांबद्दलही सांगितलं जाणार आहे.(Reuters)
जन्मदर नियंत्रित करण्यासाठी नवविवाहित जोडप्यासाठी 'वेडिंग किट' देण्याचा घोषणा ओडिशा सरकारनं केली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ओडिशा सरकारकडून नवदांम्पत्यांना ही भेट दिली जाणार आहे. ही योजना राबवण्यासाठी आशा वर्कर्सना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
share
(2 / 4)
जन्मदर नियंत्रित करण्यासाठी नवविवाहित जोडप्यासाठी 'वेडिंग किट' देण्याचा घोषणा ओडिशा सरकारनं केली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ओडिशा सरकारकडून नवदांम्पत्यांना ही भेट दिली जाणार आहे. ही योजना राबवण्यासाठी आशा वर्कर्सना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.(HT)
ओडिशातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालिका शालिनी पंडित यांनी या योजनेविषयी बोलताना सांगितलं की, देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. हा उपक्रम जिल्हा आणि ब्लॉक पातळीवरून सुरू करण्यात येणार आहे, नवदांम्पत्यांना कंडोम देणं हे राष्ट्रीय आरोग्य अभियान प्रकल्पाचा एक भाग असल्याचं त्यांनी सांगितलं.
share
(3 / 4)
ओडिशातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालिका शालिनी पंडित यांनी या योजनेविषयी बोलताना सांगितलं की, देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. हा उपक्रम जिल्हा आणि ब्लॉक पातळीवरून सुरू करण्यात येणार आहे, नवदांम्पत्यांना कंडोम देणं हे राष्ट्रीय आरोग्य अभियान प्रकल्पाचा एक भाग असल्याचं त्यांनी सांगितलं.(HT)
नवविवाहित जोडप्यांमध्ये जागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचंही राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालिका शालिनी पंडित सांगितलं आहे. त्यामुळं आता ओडिशा सरकारनं सुरू केलेल्या या स्तुत्य योजनेचं देशभरात कौतुक केलं जात आहे.
share
(4 / 4)
नवविवाहित जोडप्यांमध्ये जागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचंही राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालिका शालिनी पंडित सांगितलं आहे. त्यामुळं आता ओडिशा सरकारनं सुरू केलेल्या या स्तुत्य योजनेचं देशभरात कौतुक केलं जात आहे.(HT)
इतर गॅलरीज