मुंबईत कालपासून सुरु झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर पावसात कोस्टल रोड आणि मिलन सबवे भागातील कार्यान्वित असलेल्या यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी केली.
मुंबईत ज्या सखल भागामध्ये पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी होते, अशा ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत.
मिलन सबवे या भागात पावसाळ्यात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास होतो. यावर्षी पाण्याचा निचरा करण्यासाठी हजारो लिटर क्षमतेचे वॉटर टॅंक कार्यान्वित करण्यात आले आहेत.