शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्रीपद मिळवणारे एकनाथ शिंदे राजकारणातील खूपच व्यस्त व्यक्ती आहेत. त्यातच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला न्यायालयात प्रलंबित असताना राजकारण आणि दैनंदिन आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्यातून ब्रेक घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सातारा जिल्ह्यातील मूळ गावी शेतात रमले आहेत.
(1 / 5)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळगाव दरे हे सातारा जिल्ह्यातील कांदाटकी खोर्यातील डोंगरांमध्ये आणि कोयना धरणाच्या तिरावर वसलेलं आहे. मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा सभागृहात भाषण करताना शिंदे यांनी बंड फसले असते तर गावाकडे जाऊन शेती केली असते म्हटले होते. आता दोन दिवसांची सुट्टी घेत एकनाथ शिंदे शेतामध्ये रमले आहेत.
(2 / 5)
या दोन दिवस पूर्व वेळ मुख्यमंत्री शेतात राबले आहे. सकाळी शेताच्या बांधा-बांधावरुन जात शेतामध्ये अनेक भाज्यावर्गीय पिकांची लागवड केली. अनेक ठिकाणी नांगरट केली.
(3 / 5)
मुख्यमंत्र्यांनी सैंद्रीय शेती केली असून शेतात कोणतंच रासायनिक खत वापरलेलं नाही. त्यांच्या शेतामध्ये लवंग, वेलची, दालचिनी, कॉफी, पेरू, आंबा, फणस, चिक्कू, सफरचंद, स्ट्रॉबेरी, मिरची, हळद आदि पिके घेतल्याचे सांगितले जात आहे.
(4 / 5)
मुख्यमंत्र्यांनी या शेतीबरोबर गोशाळाही तयार केले आहे. गोशाळेतील गाईंना रसायनमुक्त चारा दिला जातो.
(5 / 5)
याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या शेततळ्यात मत्स्योत्पादनही केलं जातं.