
ख्रिसमससोबतच नवीन वर्षाचे सेलिब्रेशनही सुरू होते. प्रत्येकजण पार्टीच्या मूडमध्ये आहे. जर तुम्ही ख्रिसमससाठी तुमच्या घरी पाहुण्यांना आमंत्रित केले असेल, तर तुम्ही त्यांना 'हे' ६ झटपट बणणारे भारतीय स्नॅक्स सर्व्ह करू शकता. हे पदार्थ बनवणे देखील खूप सोपे आहे.
ख्रिसमस पार्टीत भारतीय स्नॅक्समधील खास पदार्थ 'पनीर लॉलीपॉप' हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. हेल्दी असण्यासोबतच तो खूप चविष्ट देखील लागतो. या लॉलीपॉपवर पिरीपिरी मसाला टाकू शकता.
ग्रील्ड भाज्यांसोबत पनीर टिक्का खायला जवळपास सगळ्यांनाच आवडतो. जर तुम्ही घरी ख्रिसमस पार्टी देत असाल तर पाहुण्यांसाठी हा पदार्थ तयार करणे खूप सोपे होईल.
भाज्यांसोबत स्प्रिंग रोल बनवण्याऐवजी नूडल्स रोल बनवा आणि ख्रिसमस पार्टीत पाहुण्यांना सर्व्ह करा. हा चटपटीत आणि खुसखुशीत पदार्थ सर्वांनाच आवडतो.
जर मुलांना पार्टीसाठी आमंत्रित केले असेल, तर त्यांना चीज पोटॅटो कॉर्न बॉल्स नक्कीच आवडतील. त्यामुळे तुमच्या ख्रिसमस पार्टीत हे सामील करायला विसरू नका. हा पदार्थ लहान आणि मोठे दोन्ही वयोगटाला आवडणारा आहे.
टेस्टी ब्रेड पॉकेट्स बटाटे, भाज्या किंवा चीज यांसारख्या कोणत्याही गोष्टीपासून तयार केले जाऊ शकतात. हे तुम्ही घरी सहज तयार करू शकता आणि ख्रिसमस पार्टीमध्ये सर्व्ह करू शकता.




