मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Childhood Photo: वकील बनण्याचं स्वप्न पाहणारी ‘ही’ चिमुकली आता गाजवतेय बॉलिवूड! ओळखलंत का?

Childhood Photo: वकील बनण्याचं स्वप्न पाहणारी ‘ही’ चिमुकली आता गाजवतेय बॉलिवूड! ओळखलंत का?

Apr 16, 2024 08:26 PM IST Harshada Bhirvandekar

Childhood Photo: फोटोमध्ये दिसणारी ही मुलगी अतिशय मजबूत फिल्मी बॅकग्राउंडमधून आली आहे. असे असूनही, या मुलीला चित्रपटांपासून दूर जाऊन करिअर करावे, असे वाटत होते.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, जे दररोज स्वतःबद्दल अनेक मनोरंजक खुलासे करत असतात. असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांना चित्रपट विश्वात यायचे देखील नव्हते. चित्रपटांमध्ये काम करणे हे त्यांचे स्वप्न नव्हते. मात्र, काही कलाकार हे आधीच फिल्मी कुटुंबांतून असल्यामुळे ते चित्रपटातच काम करतील, असे लोकांना वाटत होते. फोटोत दिसणारी ही मुलगी सुद्धा एका मोठ्या फिल्मी कुटुंबातील आहे. तिलाही चित्रपटांमध्ये करिअर करायचे नव्हते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

फोटोमध्ये दिसणारी ही मुलगी अतिशय मजबूत फिल्मी बॅकग्राउंडमधून आली आहे. असे असूनही, या मुलीला चित्रपटांपासून दूर जाऊन करिअर करावे, असे वाटत होते. या मुलीला वकील व्हायचे होते. पण, तिच्या नशिबात काहीतरी वेगळेच लिहिलेले होते. आणि परंपरागत ती देखील मनोरंजनविश्वात आली. ती केवळ मनोरंजन विश्वात आलीच नाही तर, तिने बॉलिवूड गाजवलं.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

या फोटोंमध्ये दिसणारी मुलगी दुसरी कोणी नसून, करीना कपूर खान आहे. करीना कपूरला आधी वकील बनायचे होते. पण, त्यात यश न मिळाल्याने तिने तिची मोठी बहीण करिश्मा कपूरप्रमाणे चित्रपटांमध्ये नशीब आजमावले आणि सुपरस्टार बनली.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

करीना कपूर खानने २०००साली 'रिफ्युजी'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिषेक बच्चन दिसला होता. यानंतर करीनाने तिच्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. तिचा नुकताच 'क्रू' हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे, जो बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

करीना कपूरने २०१६मध्ये अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केले. या जोडप्याला तैमूर अली खान आणि जेह अली खान अशी दोन मुले आहेत. करीना ही चित्रपटसृष्टीतील अशी अभिनेत्री आहे, जिने लग्नानंतरही आपले काम चालू ठेवले आणि सतत हिट चित्रपट दिले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीची एकूण संपत्ती ४८५ कोटी रुपये आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

करीना कपूरने २०१६मध्ये अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केले. या जोडप्याला तैमूर अली खान आणि जेह अली खान अशी दोन मुले आहेत. करीना ही चित्रपटसृष्टीतील अशी अभिनेत्री आहे, जिने लग्नानंतरही आपले काम चालू ठेवले आणि सतत हिट चित्रपट दिले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीची एकूण संपत्ती ४८५ कोटी रुपये आहे.(Instagram/@kareenakapoorkhan)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज