Eknath Shinde Paithan Visit : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे आज चौथ्यांदा औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते भुमरेंच्या मतदारसंघात सभा घेऊन त्यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.
(HT)एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी शिवसेनेतून बंड केलं होतं, त्यावेळी जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदारांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यात तात्कालीन मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, रमेश बोरनारे आणि संजय शिरसाट यांचा समावेश होता.
(HT_PRINT)औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शपथ घेतल्यानंतर संदीपान भुमरे यांनी पैठणमध्ये रॅली काढली होती. त्यावेळी त्यांच्या कार्यक्रमाकडे लोकांनी पाठ फिरवली होती. त्यानंतर आता आज त्यांनी पैठणमध्ये थेट मुख्यमंत्र्यांची सभा लावली आहे.
(HT)शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या पाच आमदारांबाबत जिल्ह्यात मोठी नाराजी असल्याचं बोललं जात आहे. कारण शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी जिल्ह्यातील ज्या आमदारांनी बंडखोरी केली होती त्या आमदारांच्या मतदारसंघात सभा घेतल्या होत्या. त्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता शिंदे गटाकडूनही मोठं शक्तिप्रदर्शन केलं जात आहे.
(HT)शिवसेनेनं विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेंची निवड केली. त्यानंतर दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे हे सातत्यानं बंडखोर आमदारांवर टीका करत असल्यानं जिल्ह्यातील शिंदे गटात अस्वस्थता आहे. त्यामुळंच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.
(HT)मुख्यमंत्री झाल्यापासून चार वेळा औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा एकनाथ शिंदेंनी केल्यानं आता शिंदे गट औरंगाबाद महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याची चर्चा सुरू आहे.
(HT)मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात संधी न मिळाल्यामुळं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे नाराज असल्याच्या चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी थेट उद्धव ठाकरेंची प्रशंसा केली होती. त्यामुळं आता मुख्यमंत्री शिंदे औरंगाबाद दौऱ्यात त्यांचं मन वळवण्यात यशस्वी होणार का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
(HT)