csk ipl 2023 champion : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले. चेन्नई सुपर किंग्जने (CSK players strike a pose with a trophy) अंतिम सामन्यात (२९ मे) गुजरात टायटन्सचा पराभव केला. अशा प्रकारे महेंद्रसिंग धोनीच्या संघाने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली.
(1 / 8)
चेन्नई सुपर किंग्जचा संघ पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनला. अंतिम सामन्यात त्यांनी गुजरात टायटन्सचा पाच गडी राखून पराभव केला. सामना संपल्यानंतर चेन्नईच्या डगआऊटमध्ये अनेक भावनिक क्षण निर्माण झालेले दिसले.
(2 / 8)
या सामन्यात सीएसकेला विजय मिळवून देणाऱ्या रवींद्र जडेजाने पत्नी रिवाबाला मिठी मारली. यावेळी रिवाबा भावूक दिसत होती. त्याचवेळी सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही पत्नी साक्षी आणि झिवा यांना मिठी मारली.(iplt20.com)
(3 / 8)
CSK जिंकल्यानंतर धोनीने डगआऊटच्या दिशेने धावणाऱ्या जडेजाला उचलून घेतले. यानंतर मैदानावर अनेक खेळाडूंनी आपल्या फॅमिलीसोबत विजयाचा जल्लोष साजरा केला.
प्रेझेंटेशन शोपूर्वी धोनीने हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक, कृणाल पांड्या आणि त्याची पत्नी पंखुरी यांचीही भेट घेतली. धोनीने मथिशा पाथिरानाच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली.
(6 / 8)
यानंतर चेन्नई संघाला ट्रॉफी मिळाल्यावर खेळाडूंनी ट्रॉफी झिवा, रहाणेची मुलगी आर्या आणि जडेजाची मुलगी निध्याना यांना दिली.
(7 / 8)
यानंतर चेन्नई संघाला ट्रॉफी मिळाल्यावर खेळाडूंनी ट्रॉफी झिवा, रहाणेची मुलगी आर्या आणि जडेजाची मुलगी निध्याना यांना दिली.
(8 / 8)
आयपीएलचा शेवटचा सामना खेळणाऱ्या अंबाती रायुडूसोबत धोनीने बराच वेळ संवाद साधला. त्यानंतर धोनीने अहमदाबादच्या ग्राउंड स्टाफसोबतही फोटो काढले.