प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्या दरम्यान, पहाटे १ वाजता चेंगराचेंगरीची घटना घडली. घाटावर अचानक मोठी गर्दी झाल्याने ही चेंगराचेंगरी झाली. यावेळी महाकुंभ नगरचे जिल्हाधिकारी बुधवारी प्रयागराजमधील घाटावर उपस्थित होते. ते गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश सुरक्षा रक्षकांना देत असतांना टिपलेले छायाचित्र.
(HT Photo/Deepak Gupta)मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी त्रिवेणी संगमावर मोठी गर्दी जमल्याने ही चेंगराचेंगरी झाली. यात १५ नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाने याला दुजोरा दिलेला नाही. अपघातात जखमी झालेल्या अनेकांना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेण्यात आले आहे. घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात असून आखाडा परिषदेने अमृत स्नान पुढे ढकलले आहे.
(HT Photo/Deepak Gupta)रात्री अचानक गर्दी जमल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे ही चेंगरांचेंगरी झाली. घटनेनंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. रुग्णवाहिकेच्या साह्याने जखमी नागरिकांना दावखण्यात नेण्यात आले.
(HT Photo/Deepak Gupta)त्रिवेणी संगमावरील प्रचंड गर्दी उसळली. ही गर्दी सुरक्षा रक्षकांना आवरता आली नाही. त्यामुळे कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली.
(HT Photo/Deepak Gupta)मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जखमींना महाकुंभातील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत किती जण जखमी झाले हे अद्याप समजू शकलेले नाही. चेंगराचेंगरी झाल्यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.
(HT Photo/Deepak Gupta)मध्यवर्ती रुग्णालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पहाटे साडेतीन वाजल्यापासून २२ रुग्णवाहिका मध्यवर्ती रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. आखाड्याला पाच वाजल्यापासून संगम नाका येथे स्नान करायचे होते, मात्र अद्याप त्यांना आखाडा मार्गात प्रवेश करता आलेला नाही. आखाडा मार्गावर दर १०-५ मिनिटांनी रुग्णवाहिकेच्या सायरनचे आवाज ऐकू येत होते. महाकुंभमेळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या ठिकाणाजवळ सुरक्षा रक्षकांनी यात्रेकरूंना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतांना. .
(AFP)या ठिकाणी आज शाही स्नानाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र,अचानक मोठी गर्दी झाली, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. महाकुंभमेळ्यादरम्यान मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीनंतर साधू अमृतस्नान न करताच परतले.
(PTI)जखमींना महाकुंभातील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत किती जण जखमी झाले हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, मध्यवर्ती रुग्णालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महाकुंभमेळ्यादरम्यान चेंगराचेंगरी झालेल्या ठिकाणी हताशपणे बसून असलेला भाविक.
(AFP)