Chandrakanta Cast Then and Now: 'चंद्रकांता' हा टीव्ही शो ९० च्या दशकातील हिट शोपैकी एक आहे. या शोची केवळ कथाच नाही तर त्यातील 'चंद्रकांता की कहानी, ये माना है पुरानी...' हे गाणे आजही जेव्हा आपण ऐकतो तेव्हा जुन्या आठवणींमध्ये हरवून जातो. एक काळ असा होता की संपूर्ण कुटुंब एकत्र 'चंद्रकांता' पाहायचे. या शोमध्ये चंद्रकांता ते कुंवर वीरेंद्र सिंह आणि पंडित बद्रीनाथ यांच्या व्यक्तिरेखा खूप आवडल्या होत्या. आजही या कलाकारांनी आणि त्यांच्या पात्रांनी लोकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. पण ही पात्रं आता इतकी बदलली आहेत की त्यांना ओळखणं तुम्हाला खूप कठीण जाईल.
चंद्रकांतामध्ये विजयगढच्या राजकन्या चंद्रकांताची भूमिका अभिनेत्री शिखा स्वरूपने साकारली होती. टीव्ही शोशिवाय शिखा अनेक चित्रपटांमध्येही दिसली आहे. तिने २०१२ मध्ये झी टीव्हीवरील रामायण या शोमध्ये कैकेयीची भूमिकाही साकारली होती.
या शोमध्ये शाहबाज खानने कुंवर वीरेंद्र विक्रम सिंह यांची भूमिका साकारली होती. तो अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसला आहे.
क्रूर सिंहाला कोणी कसे विसरेल? शोमध्ये प्रत्येकजण त्याचा 'यक्कू' डायलॉग कॉपी करताना दिसला. ही भूमिका अखिलेंद्र मिश्रा यांनी साकारली होती.
दिवंगत अभिनेते इरफान खान यांनीही चंद्रकांतामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. शोमध्ये बद्रीनाथची भूमिका साकारून इरफानने लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते.
चंद्रकांतामध्ये पंडित जगन्नाथ यांची भूमिका अभिनेता आणि दिग्दर्शक राजेंद्र गुप्ता यांनी साकारली होती.