सनातन धर्मात पौर्णिमा तिथी अत्यंत शुभ मानली जाते. असे मानले जाते की पौर्णिमा तिथी धनाची देवी, देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. वर्षभरात १२ पौर्णिमा असल्या तरी चैत्र महिन्यातील पौर्णिमा अधिक महत्त्वाची आहे.
चैत्र पौर्णिमा ही हिंदू नववर्षाची पहिली पौर्णिमा मानली जाते. या दिवशी स्नान आणि दान करण्यासोबतच हनुमान जन्मोत्सवही साजरा केला जातो. स्नान-दानाचा शुभ वेळ जाणून घ्या.
मंगळवार २३ एप्रिल २०२४ रोजी चैत्र पौर्णिमा आहे. हनुमान जयंतीही याच दिवशी असते. या दिवशी भगवान विष्णूचे रूप असलेल्या सत्य नारायणाची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पौर्णिमा व्रत देखील पाळले जाते. चंद्राला नैवेद्य दाखवून रात्री लक्ष्मीची पूजा केल्याने सुख-समृद्धी मिळते.
पंचांगानुसार, या वर्षी चैत्र महिन्याची पौर्णिमा तिथी २३ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी सुरू होईल आणि २४ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ५ वाजून १८ मिनिटांनी समाप्त होईल. उदया तिथीनुसार चैत्र पौर्णिमा २३ एप्रिल २०२४ रोजी आहे.
चैत्र पौर्णिमेला स्नानाची शुभ वेळ -
पौर्णिमेला स्नान-दानाला फार महत्व आहे. सकाळी ४:२० ते ५:४ पर्यंत स्नानासाठी शुभ वेळ आहे. भगवान विष्णू आणि हनुमानाच्या पूजेची शुभ वेळ - सकाळी ९:३ ते दुपारी १:५८ पर्यंत. चंद्रोदयाची वेळ - संध्याकाळी ६:२५ लक्ष्मी पूजनाची वेळ – दुपारी ११:२७ ते दुपारी १२:४१ पर्यंत.
चैत्र पौर्णिमेचे महत्त्व:
श्री हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी राजा केसरी नंदन आणि आई अंजनी यांच्या पोटी झाला आहे. चैत्र पौर्णिमेला जो बजरंगबलीची पूजा करतो, सुंदरकांड, हनुमान चालीसा, रामायणाचे पठण करतो त्याला सुख-समृद्धी प्राप्त होते. श्री हनुमान स्वतः प्रत्येक संकटात त्याचे रक्षण करतात, तसेच जीवनात ऐश्वर्य प्राप्त होते.
पौराणिक मान्यतेनुसार, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शिवाजी महाराज यांची पुण्यतिथीही असते. असं म्हणतात चैत्र पौर्णिमेस कृष्ण देवांनी रासलीला केली होती आणि सर्व गोपीकांसोबत कृष्णाने रात्रभर नृत्य केले होते. ब्रज मध्ये केलेल्या या उत्सवास महारास असेही म्हणतात. पौर्णिमेला सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगविताना मोठ्या आकाराचा दिसेल.