मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Chaitra Navratri 2024: चैत्र नवरात्रीच्या काळात बनतोय ‘हा’ शुभ योग! ‘या’ ३ राशींना होणार आर्थिक लाभ

Chaitra Navratri 2024: चैत्र नवरात्रीच्या काळात बनतोय ‘हा’ शुभ योग! ‘या’ ३ राशींना होणार आर्थिक लाभ

Apr 10, 2024 04:37 PM IST Harshada Bhirvandekar

Chaitra Navratri 2024: नवरात्रीमध्ये संपूर्ण नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या चैत्र नवरात्रीत काही राशींना दुर्गामातेच्या आशीर्वादाने आर्थिक लाभ होणार आहे. जाणून घेऊया ‘या’ राशींविषयी… 

भारतात नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.  ९ एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे. चैत्र नवरात्रीमध्ये सलग ९ दिवस मोठ्या विधीने दुर्गामातेच्या ९ रूपांची पूजा केली जाते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

या चैत्र नवरात्रीत अनेक शुभ योग तयार होत आहेत. यंदाच्या चैत्र नवरात्रीत एक-दोन नव्हे, तर अनेक शुभ योग तयार होणार आहेत. यंदा चैत्र नवरात्रीत अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, षश योग आणि अश्विनी नक्षत्र यांचा योग होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ३० वर्षांनंतर चैत्र नवरात्रीला हा योग तयार होणार आहे. या शुभ योगायोगाने काही राशींना मोठा लाभ होणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

मेष : चैत्र नवरात्रीला निर्माण झालेल्या शुभ योगाचा जास्तीत जास्त लाभ या राशीत जन्मलेल्या व्यक्तींना होणार आहे. तुमच्यासाठी चैत्र नवरात्र शुभ असणार आहे. मेष राशीच्या व्यक्तींना दुर्गा मातेचा आशीर्वाद मिळेल. आपल्या जीवनात सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नोकरीत पदोन्नतीचे योग येतील. मेष राशीचे लोक आर्थिकदृष्ट्या मालामाल होतील. दुर्गा मातेच्या कृपेने तुम्हाला आर्थिक लाभ होईल. आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा सहजपणे पूर्ण करू शकाल. या राशीच्या लोकांच्या आर्थिक अडचणी दूर होतील. तुम्ही तुमच्या सर्व समस्या सोडवू शकता.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

वृषभ : एखादी चांगली बातमी मिळू शकते. या राशीच्या लोकांना दुर्गा मातेचा आशीर्वाद मिळेल. आपल्या कामात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्ही काहीही कराल, त्यात यशस्वी व्हाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरदार लोकांसाठी काळ अनुकूल आहे.  या राशीच्या लोकांच्या सर्व मनोकामना दुर्गा पूर्ण करतील. व्यवसायात असलेल्या या राशीच्या लोकांना आपल्या क्षेत्रात नफा कमावण्याची चांगली संधी मिळेल. करिअरमध्ये उच्च यश संपादन कराल. अचानक आर्थिक लाभ होण्याची ही शक्यता आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

कर्क: कर्क राशीच्या जातकांना चैत्र नवरात्रीला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. यशाची प्रतीक्षा संपेल. तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. या राशीच्या लोकांच्या सर्व आर्थिक समस्या लवकरच सुटणार आहेत. आईच्या कृपेने तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. मन प्रसन्न आणि समाधानी राहील. नोकरीच्या नवीन आणि उत्कृष्ट संधी मिळू शकतात. तसेच तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या व्यक्तींचा समाजात मान-सन्मान वाढेल.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज