मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Chaitra Navratri : चैत्र नवरात्रीत करा देवीच्या या रूपांची पूजा, नऊ दिवसाच्या नऊ रंगाचे खास महत्व

Chaitra Navratri : चैत्र नवरात्रीत करा देवीच्या या रूपांची पूजा, नऊ दिवसाच्या नऊ रंगाचे खास महत्व

Apr 10, 2024 12:24 PM IST Priyanka Chetan Mali

Chaitra Navratri 2024 : नवरात्रीत रंगांना खूप महत्त्व आहे. या नवरात्रीत नऊ दिवस, कोणत्या दिवशी तुम्हाला कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवी भगवतीचा खास आशीर्वाद मिळेल, जाणून घ्या.

चैत्र नवरात्रीची सुरुवात मंगळवार, ०९ एप्रिल २०२४. रोजी झाली. या नऊ दिवसात देवी भगवतीचा आशीर्वाद घेण्यासाठी या रंगाचे कपडे परिधान केल्यास विशेष लाभ होईल. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये, प्रत्येक दिवसाचा एक रंग आणि त्या दिवसाचे स्वतःचे आगळे-वेगळे महत्त्व आहे, त्याबद्दल जाणून घ्या.
twitterfacebookfacebook
share

(1 / 10)

नवरात्रीचा पहिला दिवस-मंगळवार, नवरात्रीचा पहिला दिवस, आई शैलपुत्रीचा दिवस. ९ एप्रिल २०२४ रोजी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ असते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 10)

नवरात्रीचा दुसरा दिवस- नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. १० एप्रिल २०२४ रोजी नवरात्रीच्या दिवशी हिरवा रंग परिधान करणे शुभ आहे. हिरवा रंग नवीन सुरुवात, वृद्धी आणि प्रजननक्षमतेचे प्रतीक आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 10)

नवरात्रीचा तिसरा दिवस- नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. गुरुवार, ११ एप्रिल २०२४ रोजी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तपकिरी रंगाचे कपडे घालणे शुभ आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 10)

नवरात्रीचा चौथा दिवस- नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी, १२ एप्रिल २०२४ रोजी केशरी कपडे परिधान करा. केशरी रंग जीवनात सकारात्मकता आणण्यास मदत करतो.
twitterfacebookfacebook
share

(5 / 10)

नवरात्रीचा पाचवा दिवस- नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. पाचव्या दिवशी, १३ एप्रिल २०२४ रोजी, स्कंदमातेचा आवडता रंग पांढरा आहे, म्हणून या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करा. पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचा मानला जातो.
twitterfacebookfacebook
share

(6 / 10)

नवरात्रीचा सहावा दिवस- नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनीची पूजा केली जाते. सहावा दिवस १४ एप्रिल २०२४ रोजी, कात्यायनी देवी लाल रंग पसंत करते म्हणून, या दिवशी लाल रंग धारण करणे खूप शुभ असते. पूजेच्या वेळी लाल रंगाचे कपडे घाला. लाल रंग ऊर्जा देतो.
twitterfacebookfacebook
share

(7 / 10)

नवरात्रीचा सातवा दिवस- नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते आणि या दिवशी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ असते. १५ एप्रिल २०२४ रोजी, सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा करताना निळा रंग परिधान करणे शुभ आहे. हा रंग समृद्धी आणि शांतता दर्शवतो.
twitterfacebookfacebook
share

(8 / 10)

नवरात्रीचा आठवा दिवस- नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीला गुलाबी रंग आवडतो असे सांगण्यात येते. १६ एप्रिल २०२४, हा आठवा दिवस असून. या दिवशी पूजा करताना गुलाबी रंगाचे कपडे घाला. गुलाबी रंग प्रेम, आपुलकी आणि सौहार्दाचे प्रतीक आहे.
twitterfacebookfacebook
share

(9 / 10)

नवरात्रीचा नववा दिवस- नवरात्रीच्या नवव्या दिवशी दुर्गा देवीच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा केली जाते. आई सिद्धिदात्रीला जांभळा रंग आवडतो. नववा दिवस १७ एप्रिल २०२४ रोजी असून, या दिवशी जांभळे वस्त्र परिधान करून पूजा करावी. जांभळा रंग वैभव आणि राजेशाही दर्शवतो.
twitterfacebookfacebook
share

(10 / 10)

नवरात्रीचा नववा दिवस- नवरात्रीच्या नवव्या दिवशी दुर्गा देवीच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा केली जाते. आई सिद्धिदात्रीला जांभळा रंग आवडतो. नववा दिवस १७ एप्रिल २०२४ रोजी असून, या दिवशी जांभळे वस्त्र परिधान करून पूजा करावी. जांभळा रंग वैभव आणि राजेशाही दर्शवतो.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज