चैत्र अमावस्येला शनि जयंती साजरी केली जाईल. याशिवाय वर्षातील पहिले सूर्यग्रहणही याच दिवशी होणार आहे. पौर्णिमेसोबतच हिंदू धर्मग्रंथांमध्ये अमावस्येलाही विशेष महत्त्व आहे. अमावस्येच्या दिवशी दान केल्याने पितरं प्रसन्न होतात आणि ग्रहांचे अडथळे दूर होतात असे मानले जाते. यावेळी २० एप्रिल रोजी चैत्रची अमावस्या येत आहे. सूर्यग्रहणासोबतच या दिवशी काही दुर्मिळ ग्रहांचे संयोगही होत आहेत. चैत्र अमावस्या आणि त्यासंबंधीचे खास उपाय काय आहेत ते पाहूया.
(Pixabay च्या प्रतिमा सौजन्याने)
यावर्षी चैत्र अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योग आणि प्रीती योग तयार होत आहेत. याशिवाय या दिवशी शनी जयंतीही साजरी केली जाणार आहे. याशिवाय वर्षातील पहिले सूर्यग्रहणही याच दिवशी होणार आहे. हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसलं तरी योगायोग या दिवसाला खास बनवत आहेत. या दिवशी काही साधनांचा अवलंब केल्यास जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.
पाण्यात तूळ घालून करावं स्नान : चैत्र अमावस्येला पाण्यात तीळ टाकून स्नान करावे. शनीच्या दोषापासून मुक्ती मिळते.
पितरांना खुश करावं : या दिवशी पितरांचे श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण करावे. यामुळे कुंडलीतील दोष संपतो.
जन्मपत्रिकेत कालसर्प दोष असल्यास या दिवशी भगवान शंकराची पूजा करावी. शिवलिंगाला अभिषेक करा आणि भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करा.
साडसातीपासून मुक्ती हवी असल्यास : साडेसातीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून मुक्ती मिळावी यासाठी सकाळी अश्वथ आणि वटवृक्षांना जल अर्पण करा. संध्याकाळी झाडाखाली देशी तुपाचा दिवा लावावा.
चैत्र अमावस्येला सूर्यग्रहणही आहे त्यामुळे कोणतंही शुभ काम किंवा नवीन काम करू नका. हिंदू धर्मात ग्रहण अत्यंत अशुभ मानलं जातं. ग्रहणात कोणतंही काम केलं जात नाही.