कोलकात्यात येथे आरजी कार मेडिकल कॉलेजमधील एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. महिला डॉक्टरच्या हत्येविरोधात देशभरातली डॉक्टरांनी मोर्चे काढले. अनेक कलाकारांनी देखील यावर संताप व्यक्त केला. दरम्यान, अभिनेत्री सेलिना जेटलीने देखील पोस्ट करत एक अनुभव सांगितला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीने केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सेलिनाने घट्ट कपडे घालण्याचे आणि थोडे पाश्चिमात्य असण्याचे परिणाम तिला भोगावे लागले असल्याचं या पोस्टमध्ये म्हटले आहे.
कोलकाता बलात्कार प्रकरणादरम्यान सेलिना जेटलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. लहानपणीचा फोटो शेअर करत तिने सांगितले की, ती अनेक वेळा जीवघेण्या कृत्यांना बळी पडली आहे.
“पीडित नेहमीच दोषी असते. माझा हा फोटो इयत्ता सहावीमधील आहे. त्यावेळी माझ्या जवळच्या विद्यापीठातील मुले माझ्या शाळेबाहेर थांबू लागली. तो रोज माझ्या रिक्षाच्या मागे यायची. मी सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. पण अवघ्या काही दिवसांत माझ्या लक्षात आले. जेव्हा त्यांनी रस्त्यावर दगडफेक करायला सुरुवात केली तेव्हा ही गोष्ट आवर्जून जाणवली. तिथे उभे असलेले कोणीही काही बोलले नाही" असे सेलिना म्हणाली.
पुढे ती म्हणाली, “या घटनेबद्दल माझ्या शिक्षिकेने मला सांगितले की मी एक अतिशय पाश्चिमात्य मुलगी आहे, जिने ना केसांना तेल लावले, ना केसांची वेणी घातली, ना सैल कपडे घातले. ही माझी चूक होती. या वयात मी अशा गोष्टींचा सामना केला ज्या मला करायला नको होत्या. एके दिवशी मी सकाळी शाळेत जाण्यासाठी माझ्या रिक्षाची वाट पाहत असताना एका माणसाने त्याचे प्रायव्हेट पार्ट दाखवले. काही वर्षे या सगळ्यासाठी मी स्वतःलाच दोष देत राहिले. शिक्षक जे काही बोलले त्यामुळे माझीच चूक आहे, असे मला वाटायचे.”