सध्या सर्वत्र गणेशउत्सवाचे भक्तीमय वातावरण दिसत आहे. गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. सर्वसामान्यांपासून ते बड्या कलाकारांपर्यंत सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचे आगाम झाले आहे. काही मालिकांच्या सेटवर गणपती बाप्पा आले आहेत. तर काही मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या घरी बप्पाचे आगमन झाले आहे. कोणत्या कलाकारांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे चला पाहूया…
मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. त्याने धुमधडाक्यात बाप्पाचे स्वागत केले आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. तिने स्वत:च्या हाताने बाप्पाची मूर्ती घडवली आहे.
अभिनेत्री सायली संजीवने मराठमोळा लूक करत बाप्पाचे स्वागत केले आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.