आजच्या काळात, स्टार्सप्रमाणेच सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएंन्सरची लोकप्रियताही खूप जास्त आहे. या सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. हीरो हिरोईन प्रमाणे या इन्फ्लुएंन्सरच्या कमाईचा अंदाज लावणे तुमच्यासाठी खूप कठीण आहे. Ormax Media ने सर्वात लोकप्रिय प्रभावशाली इन्फ्लुएंन्सरची यादी प्रसिद्ध केली आहे जी नोव्हेंबर २०२४ च्या डेटावर आधारित आहे. या यादीत प्रथम क्रमांकावर कोण आहे ते जाणून घेऊयात?
कॅरी मिनाटी : यादीनुसार सोशल मीडिया इन्फ्लुएंन्सरच्या यादीत कॅरीमिनाटी पहिल्या क्रमांकावर आहे. कॅरीचे खरे नाव अजय नागर आहे. कॅरी मिनाटी एक YouTuber आणि रॅपर आहे. त्याचं नुकतचं एक गाण देखील यूट्यूबवर व्हायरल झालं होतं. तो सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंन्सर आहे.
मिस्टर बीस्ट : ऑर्मॅक्स मीडियाच्या या यादीत मिस्टर बिस्ट हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तो अमेरिकन YouTuber आहे, पण त्याची लोकप्रियता भारतातही खूप जास्त आहे. त्याचे फॅन फॉलोअर देखील मोठ्या प्रमाणात आहेत. तो वेगवेगळे टास्क देऊन कोट्यवधी रुपये स्पर्धकांना वाटत असल्याने त्याची प्रसिद्धी जास्त आहे.
भुवन बाम : भुवन बाम या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भुवन बाम विनोदी कलाकार, गायक, गीतकार आणि यूट्यूबर आहे. त्याचं यूट्यूबवर कॉमेडी चॅनेल 'बीबी की वाईन्स' प्रसिद्ध आहे. भुवनचे २०१८ मध्ये १० दशलक्ष फॉलोअर्स होते. एवढ्या फॉलोअर्सचा आकडा पार करणारा तो पहिला भारतीय यूट्यूबर बनला आहे.
ध्रुव राठी : ध्रुव राठी या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. ध्रुवची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. ध्रुव राठी हा एक भारतीय YouTuber, व्लॉगर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंन्सर आहे. सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणविषयक समस्यांवरील YouTube विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी तो ओळखला जातो. ५ डिसेंबर २०२४ पर्यंत, ध्रुव राठीचे अंदाजे २६.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ हे ३.६ अब्ज वेळा पाहिले गेले आहेत.
संदीप माहेश्वरी : मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी पाचव्या क्रमांकावर आहे. संदीप माहेश्वरी प्रसिद्ध यूट्यूबर असून त्याचे आज करोडो फॉलोअर्स आहेत. तुम्ही त्याचे मोटिव्हेशनल व्हिडिओ YouTube किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहिले असतील. संदीप महेश्वरी हा केवळ मोटिव्हेशनल स्पीकर नसून तो उद्योजक आणि छायाचित्रकार देखील आहेत. imagesbazaar.com नावाच्या वेबसाइटचा तो सीईओ आहे, जे भारतीय स्टॉक खरेदी विक्री संदर्भातील मोठी कंपनी आहे. त्याच्या यूट्यूब चॅनेलचे सध्या २७ दशलक्षाहून अधिक फॉलोयर्स आहेत.
रणवीर अलाहाबादिया : रणवीर अलाहाबादिया सहाव्या स्थानावर आहे. रणवीर हा YouTuber आहे, जो स्टार्सपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांच्या मुलाखती घेतो. त्याच्या देखल सोशल मिडियावर मोठा फॅन फॉलोअर आहे. आणि तो भारतातील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंन्सरपैकी एक आहे.
समय रैना : या यादीत सातव्या क्रमांकावर समय रैना आहे. समय एक भारतीय स्टँड-अप कॉमेडियन आणि YouTuber आहे.
पर्ल माने : पर्ल माने नवव्या क्रमांकावर आहेत. पर्ल एक प्रसिद्ध YouTuber आणि अभिनेत्री आहे. ती मल्याळम शोमध्ये काम करते.