बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४'च्या ओपनिंग सेरेमनीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये उर्वशी एकदम क्लासी लूकमध्ये दिसत आहे. तिच्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
उर्वशीच्या लूक विषयी बोलायचे झाले तर तिने गुलाबी रंगाचा डीप नेक थाय हाय स्लिट गाऊन परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे.